मोटारीसह पाच दुचाकी आगीमध्ये जळून खाक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 मार्च 2017

पुणे - शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळ पहाटे लागलेल्या आगीत दोन मोटारींसह पाच दुचाकींचे नुकसान झाले. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

पुणे - शनिवार पेठेतील वर्तक बागेजवळ पहाटे लागलेल्या आगीत दोन मोटारींसह पाच दुचाकींचे नुकसान झाले. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. 

वर्तक बागेजवळ सार्वजनिक रस्त्यावर वाहने पार्क करण्यात आली होती. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास या वाहनांना आग लागली. स्थानिक नागरिकांनी ही बाब अग्निशमन दलास कळवली. त्यानंतर कसबा अग्निशमन केंद्रातील तांडेल अनिल करडे, तसेच कमलेश चौधरी, राजू जगदाळे, जितेंद्र सपाटे, महेश गारगोटे, कर्णे आदी जवानांनी आग आटोक्‍यात आणली. या आगीत मारुती व्हॅन आणि पाच दुचाकी जळून खाक झाल्या. तर, अन्य एका मोटारीच्या चाकाला आग लागल्यामुळे त्या मोटारीचे नुकसान झाले. गेल्या काही महिन्यांपासून गाड्या जाळण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलिस करीत आहेत.

Web Title: moto & two wheeler consumed