खा. सुप्रिया सुळेंच्या प्रयत्नांमुळे वयोश्री नागरिकांना मिळणार आरोग्य साधने

राजकुमार थोरात
शनिवार, 14 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे लोकसभा मतदारसंघातील ३२९० वयोश्रींना केंद्रीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून २ कोटी ८१ लाख ६० हजारांची आरोग्य साधनांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी दिली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा देण्यासाठी  २० मार्च ते २८ मार्च २०१८ या कालावधीत वयोश्री योजना राबविली होती. या योजनेतंर्गत  बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला, फुरसुंगी, पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा व मुळशी या ९ ठिकाणी आरोग्य शिबिरे घेतली होती. या आरोग्य शिबिरांमध्ये ७४१३ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. यातील ३२९० रुग्ण आरोग्य साधनांसाठी पात्र ठरले असून या लाभार्थ्यांना चष्मा, व्हील चेअर, श्रवणयंत्र इत्यादी प्रकारची १५ हजार ६७३ आरोग्य साधनांचे वाटप करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यामध्ये वयोश्रीची दोन शिबिरे घेण्यात आली होती.

यातील एक शिबिर नागपूर व दुसरे शिबिर बारामती लोकसभा मतदार संघामध्ये झाले.  भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर,पुणे जिल्हा परिषद,यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र या संस्थांच्या सहकार्याने शिबिर यशस्वी पार पडले होते. केंद्र सरकारचा जिल्ह्यामध्ये आरोग्यासाठी एकाचवेळी एवढा मोठा निधी मिळाला असून खासदार सुळे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. लवकरच या लाभार्थींना आरोग्य साधनांचे वाटप होणार असल्याची माहिती सभापती माने यांनी दिली आहे.

Web Title: mp Supriya Sules efforts will give health facilities to the aged people