माजी आमदार मुकुंद कुलकर्णी यांचे निधन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - पुणे शिक्षक मतदारसंघातील माजी आमदार मुकुंद कुलकर्णी (वय 90) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 1966 ते 1978 दरम्यान त्यांनी विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधित्व केले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे ते प्रतिनिधी होते. अखिल भारतीय शिक्षक महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य मान्य खासगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे ते संस्थापक अध्यक्षही होते. सरस्वती विद्यामंदिर येथे ते शिक्षक होते. त्यांच्या पश्‍चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले, ""शिक्षकांची चळवळ उभी करण्यासाठी मुकुंद कुलकर्णी यांनी आयुष्य वेचले. शिक्षण आणि शिक्षकांच्या कल्याणासाठी त्यांनी हजारो कार्यकर्ते तयार केले. देशातील शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शिक्षण क्षेत्रात आम्हा सर्वांना ते मोलाचे मार्गदर्शन करीत असत.''