पुणे : मुळामुठा नदीतील जलपर्णी भोवली; मलःनिसारण विभाग प्रमुखास नोटीस

मुळा मुठा नदी आणि कात्रज, पाषाण येथील तलावातील जलपर्णी काढण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा आहेत
Mulamutha river water hyacinth Dr Kunal Khemnar Order to show cause pune
Mulamutha river water hyacinth Dr Kunal Khemnar Order to show cause pune sakal

पुणे : मुळामुठा नदीतील जलपर्णी काढण्याकडे होणाऱ्या दुर्लक्षामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. पण संबंधित अधिकाऱ्यांकडून गांभीर्याने कार्यवाही केली जात नसल्याने मलःनिसारण विभागाच्या प्रमुखांना अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.मुळा मुठा नदी आणि कात्रज, पाषाण येथील तलावातील जलपर्णी काढण्यासाठी दोन स्वतंत्र निविदा आहेत. गेल्या वर्षी नदीसाठी १ कोटी तर तलावासाठी ५० लाख रुपयांची निविदा काढली होती. त्याची मुदत अद्यापही सुरू आहे. खडकवासला ते संगमावाडीमध्ये मुठा नदीत आणि मुळा नदीत बाणेरपासून जलपर्णी येत आहे.

पण मुळामुठा नदीमध्ये ठराविक ठिकाणी थांबूनच ठेकेदाराकडून निविदा काढली जात आहे. ठेकेदाराकडे जलपर्णी काढण्यासाठी मशिन असली तरी ती सर्व ठिकाणी जाऊ शकत नाही असे सांगितले जाते. पण अडकलेली जलपर्णी पुढे ढकलण्यासाठी ठेकेदाराकडूनच कोणतीही व्यवस्था केलेली नाही. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाची यंत्रणा वापरावी लागत आहे. ‘सकाळ’ने याबाबत वृत्त प्रकाशित करून अधिकाऱ्यांची ठेकेदारावर असलेली मेहेरबानी समोर आणली.

जलपर्णी काढण्याच्या कामात दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास आल्याने मलःनिसारण विभागाचे प्रमुख जगदीश खानोरे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसांची मुदत देण्यात आली आहे, असे खेमनार यांनी सांगितले.

अतिरिक्त आयुक्तांकडून पाहणी

शहरातील जलपर्णीची समस्या गंभीर झाल्याने अतिरिक्त आयुक्त खेमणार यांनी आज (ता. २६) पाषाण तलाव येथील स्थितीची पाहणी केली. एक दोन मशिनने जलपर्णी काढणे अशक्य असल्याने त्यासाठी जास्तीची यंत्रणा लावावी लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी इतर ठिकाणी मशिन थांबण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे खेमणार यांनी सांगितले. तर, मलःनिसारण विभागातील अधिकाऱ्यांनी मुठा नदीतील पाहणी केली आहे, त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असल्याचे खेमणार यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com