मल्टिटास्कर

मल्टिटास्कर

- प्रा. पीटर वायबल, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी झेडकेएम
साहित्य, वैद्यक, तत्त्वज्ञान, लॉजिक आणि चित्रपट अशा क्षेत्रांत मुशाफिरी करून त्यावर आपला ठसा उमटवणारे पीटर यांचा १९४४ मध्ये ओडिशात जन्म झाला. युरोपातील मीडिया आर्टमध्ये त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. बफोलोतील (अमेरिका) न्यूयॉर्क विद्यापीठाच्या माध्यम विभागाच्या डिजिटल आर्ट लॅबोरेटरीचे ते प्रमुख होते. त्यानंतर त्यांनी फ्रॅंकफुर्ट येथे इन्स्टिट्यूट ऑफ न्यू मीडिया सुरू केली. त्याचे काम त्यांनी १९९५ पर्यंत पाहिले. लिझमधील ‘अर्स इलेक्‍ट्रॉनिका’चे १९८६ ते १९९५ दरम्यान आर्टिस्टिक डायरेक्‍टर होते. १९९३ ते २०११ या कालावधीत ग्रासमधील न्यू गॅलरीचे चीफ क्‍युरेटर होते. १९९९ पासून ते सेंटर फॉर आर्ट अँड मीडिया, कार्ल्सऱ्हूचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांना हेलसिंकी आणि हंगेरीतील विद्यापिहरठांनी सन्माननीय डॉक्‍टरेट प्रदान केली. म्युनिकमधील बव्हेरियन अॅकॅडमी ऑफ फाईन आर्टस्‌चे पूर्ण सदस्यत्व त्यांना मिळाले असून, युरोपियन फाउंडेशन फॉर कल्चरनेही त्यांना पारितोषिक दिले आहे. ऑस्ट्रियन क्रॉस ऑफ ऑनर फॉर सायन्स, आर्टने त्यांच्या कार्यकर्तृत्वात मानाचा शिरपेच खोवला. २०१३ मध्ये त्यांना साझबर्गमधील युरोपीयन अॅकॅडमी ऑफ सायन्स अँड आर्टस्‌चे सदस्यत्व मिळाले आहे. २०१५ मध्ये त्यांना मॉस्कोतील रशियन अॅकॅडमी ऑफ आर्टस्‌चे सन्माननीय सदस्यत्व मिळाले.

डिजिटल चॅंपियन

- प्रा. गेसी यूस्ट, बर्लिन कला विद्यापीठात डिझाइन रिसर्च लॅबच्या प्रमुख 
२००५ पासून बर्लिन विद्यापीठात डिझाइन या विषयात योगदान देणाऱ्या प्रा. गेसी यूस्ट उपभोक्‍त्यास उपयुक्त ठरेल, अशा रचनात्मक बाबींवर काम करत आहेत. मानव-संगणक सुसंवाद, तंत्रज्ञान विकासातील वैविध्य आणि लिंगभेदाचे स्थान अशा बाबींकडे त्या विशेष लक्ष देतात. २०१० पर्यंत त्या टेक्‍निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनमध्ये इंटरॲक्‍शन डिझाईन अँड मीडियाच्या ज्युनियर प्राध्यापक होत्या. त्याला टेलिकॉम इनोव्हेशन लॅबोरेटरीज्‌ने सहकार्य केले आहे. बर्लिनच्या महापौरांनी त्यांचा ‘यंग टॅलेंट अॅवॉर्ड फॉर सायन्स’ देऊन सन्मानित केले आहे. त्या जर्मन सोसायटी फॉर डिझाईन थियरी अँड रिसर्चच्या अध्यक्षा; तसेच जर्मन नॅशनल अॅकॅडमीक फाउंडेशनच्या कार्यकारी मंडळावर आहेत. २०१४ मध्ये त्यांची युरोपीय महासंघाच्या आयोगावर डिजिटल चॅंपियन म्हणून नियुक्ती केली आहे. २०१५ पासून त्या सॅप एसईच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com