द्रुतगती महामार्गावरील पुण्याकडील वाहतूक रात्रीपासून पूर्ववत

गणेश बोरुडे
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

चाकणकडून तळेगावमार्गे जुन्या मुंबई महामार्गाकडे जाणारी वाहने थांबविण्यासाठी जागा नसल्याने भंडारा टोल नाका आणि तळेगाव वाहतूक पोलिसांना नाईलाजास्तव ती थोपविता आली नाहीत.

तळेगाव स्टेशन : जोरदार पावसामुळे जलमय झालेल्या मुंबईत संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मंगळवारी रात्री थांबविलेली पुण्याकडील वाहतूक रात्री साडेआठनंतर टप्प्याटप्प्याने वाहने सोडल्यानंतर पूर्ववत होऊन सुरळीत चालू झाली आहे.

महामार्ग सुरक्षा विभागाकडून आदेश आल्यानंतर यशवंतराव चव्हाण पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील आणि जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतूक सायंकाळी ७ पासून थांबविण्यात आली होती. मात्र रात्री दहानंतर समुद्राची भरती ओसरण्याची शक्यता गृहीत धरुन उर्से आणि कुसगाव टोल नाक्यावरुन टप्प्या टप्प्याने छोटी आणि नंतर मोठी वाहने सोडण्यात आल्याची माहिती आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रात्री साडे आठनंतर ठाणे आणि कल्याणकडे जाणारी छोटी वाहने चौकशी करुन सोडण्यात आल्याचे तळेगावचे पोलीस निरीक्षक मुगुटराव पाटील यांनी सांगितले. त्यानंतर हळूहळू सर्वच वाहने आल्याने मध्यरात्रीनंतर वाहतूक सुरळीत झाली. तिकडे चाकणकडून तळेगावमार्गे जुन्या मुंबई महामार्गाकडे जाणारी वाहने थांबविण्यासाठी जागा नसल्याने भंडारा टोल नाका आणि तळेगाव वाहतूक पोलिसांना नाईलाजास्तव ती थोपविता आली नाहीत. वाहतूक पूर्ववत सुरु झाली असली तरी, परिस्थिती लक्षात घेता मुंबईकडे जाणाऱ्या छोट्या मोठ्या वाहनांचा ओघ बुधवारी सकाळपासून काहीसा थंडावलेला दिसतो आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
व्हॉट्‌सऍप कॉलवरून बोलताना त्याने मरणाला कवटाळले 
नदीकाठच्या रस्त्याबाबत सुळे-आयुक्त चर्चा 
केशरी शिधापत्रिका होताहेत पिवळ्या; सरकारी योजना लाटण्यासाठी काळबाजार
रस्ते कामाबाबत चीनचे "गोलमाल'
कांद्याच्या भावाला लगाम बसणार
पावसामुळे रेल्वे, बस सेवा विस्कळित 
प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी उपाययोजना कराव्यात
उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र जपानवरून झेपावले
मुसळधार पावसाने मुंबईत वाहतूक कोंडी 
'मंथन'ने घडवले मोहक नृत्यदर्शन