सहकारी महिलेवर अत्याचार : मुंबई मनपाचा अभियंता अटकेत  

दीपक शेलार
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

ठाण्यातील घोडबंदररोड भागात राहणाऱ्या एका 38 वर्षीय घटस्पोटीत महिलेशी मुंबई महापालिकेत दुय्यम अधीक्षक अभियंता असलेल्या शिंदे यांनी लगट करून,आपल्या पदाचा गैरवापर करून विवाहाचे आमिष दाखवले.तसेच,गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला.हा प्रकार ऑक्टो.2016 ते जून 2017 या कालावधीत घडला.दरम्यान,या प्रकारचे अश्लील फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी देवून वारंवार अत्याचार केल्यानंतर फोन उचलण्यास टाळाटाळ करू लागल्याने पिडीत महिलेने पोलिसात धाव घेतली

 ठाणे - सहकारी महिलेशी जवळीक साधून विवाहाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेतील दुय्यम अभियंत्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. दत्तात्रय नाना शिंदे असे या अभियंत्याचे नाव असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे.याबाबतची तक्रार पिडीत महिलेने कासारवडवली पोलिसात केली होती.अवैध संबंधाचे अश्लील फोटो काढून बदनामी करण्याची धमकी देवून या अभियंत्याने वारंवार अत्याचार केल्याचेही पिडीतेने तक्रारीत नमूद केल्याने पोलीसानी लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

ठाण्यातील घोडबंदररोड भागात राहणाऱ्या एका 38 वर्षीय घटस्पोटीत महिलेशी मुंबई महापालिकेत दुय्यम अधीक्षक अभियंता असलेल्या शिंदे यांनी लगट करून,आपल्या पदाचा गैरवापर करून विवाहाचे आमिष दाखवले.तसेच,गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला.हा प्रकार ऑक्टो.2016 ते जून 2017 या कालावधीत घडला.दरम्यान,या प्रकारचे अश्लील फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी देवून वारंवार अत्याचार केल्यानंतर फोन उचलण्यास टाळाटाळ करू लागल्याने पिडीत महिलेने पोलिसात धाव घेतली.

त्यानुसार,लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी गुरुवारी रात्री अभियंता शिंदे यांना अटक करून कोठडीत डांबले आहे.अशी माहिती कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दत्तात्रय ढोले यांनी माध्यमांना दिली.