काँग्रेसमध्ये इनकमिंग ‘फ्री’

काँग्रेसमध्ये इनकमिंग ‘फ्री’

पुणे - काँग्रेसच्या नगरसेवकांनी अन्य पक्षामध्ये प्रवेश करू नये, यासाठी उपाययोजना करण्याची सूचना काही पदाधिकाऱ्यांनी केली. त्यानुसार नगरसेवकांची १३ ऑक्‍टोबर रोजी बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजावून घेण्यात येतील. तसेच काँग्रेसमधून अन्य पक्षामध्ये गेलेले स्वगृही येऊ इच्छित असतील तर त्यांना पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात येईल. प्रभागरचना अनुकूल नसणाऱ्यांच्या अडचणीदेखील पक्षीय पातळीवर जाणून घेण्यात येतील, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्यापूर्वी शहरात प्रभागनिहाय कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत रविवारी झाला. या बाबतचे नियोजनही या वेळी ठरले. बंडगार्डन परिसरात झालेल्या निवडक नेत्यांच्या बैठकीच्या अध्यक्षपदी डॉ. रत्नाकर महाजन होते. पक्षाचे निरीक्षक चंद्रकांत हंडोरे तसेच शहराध्यक्ष रमेश बागवे, हर्षवर्धन पाटील, विश्वजित कदम, शरद रणपिसे, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, बाळासाहेब शिवरकर, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादीबरोबर आघाडी करताना गेल्या पाच वर्षांचा अनुभव लक्षात घ्या, त्यांच्याबरोबर आपली फरफट होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना, या वेळी झाली. त्यामुळे प्रभागातील कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी या वेळी समिती नियुक्त करण्यात आली. आघाडीबाबत निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वसात घ्या, अशी सूचना काही नेत्यांनी केली. तसेच पक्षाचा जाहीरनामा करण्यासाठी तातडीने तयारी सुरू करण्याचाही निर्णय या वेळी झाला.
 

वरिष्ठ सदस्यांनी निवडणूक लढवावी
पक्षाच्या काही वरिष्ठ सदस्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे, त्यावरही चर्चा बैठकीत झाली. मात्र, प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्यामुळे आणि वरिष्ठ सदस्यांची पक्षाला गरज आहे, हे लक्षात घेऊन वरिष्ठ सदस्यांनी निवडणूक लढवावी, असेही बैठकीत ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com