मुंबई महापालिकेत युतीचीच सत्ता? - सुधीर मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

पुणे - मुंबई महापालिका निवडणुकीत सत्तेसाठी अथवा खुर्चीसाठी आम्ही लढत नव्हतो. पारदर्शकता या मुद्द्यावर आमचा भर होता. या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यात एकमत झाले आहे. त्यामुळे लवकरच चांगला निर्णय होईल, असे सूचक वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केले. यावरून मुंबई महापालिकेत महापौरपदावरून सुरू असलेल्या दोन्ही मित्रपक्षांतील वाद मिटण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या वार्षिक पतआराखड्याच्या बैठकीसाठी मुनगंटीवार पुण्यात आले होते, त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मुंबई महापालिकेतील महापौरपदावरून शिवसेना- भाजपमध्ये वाद निर्माण झाला आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर ठाकरे यांनीदेखील मंत्रिमंडळाच्या कारभारात पारदर्शकता दाखविणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला होता. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्ष एकत्र येणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या संदर्भात मुनगंटीवार म्हणाले, 'शिवसेनेच्या पारदर्शकतेच्या मुद्द्यावर आम्ही सहमत आहोत. आमच्यात या मुद्द्यावरून एकमत झाले आहे. घटनेच्या चौकटीत पारदर्शकतेच्या मुद्द्यावर ज्या तरतुदी आहेत, त्या मान्य करण्याची आमची तयारी आहे. शिवसेनेचे जे मंत्री सूचना करतील, त्यांचे स्वागतच आहे. त्यासाठी काही नियमांत बदल करावा लागेल, कायद्यात बदल करावे लागतील, त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. आम्ही सत्तेसाठी नाही, सत्यासाठी काम करणारे आहोत, त्यामुळे पारदर्शकतेचा मुद्दा आम्ही मांडला होता.''

पारदर्शक कारभाराबाबत आम्ही जनतेला देखील आवाहन करीत आहोत, त्यांनी या संदर्भात काही सूचना असतील तर त्या पाठव्यात, त्यांचा समावेश केला जाईल. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर चर्चाही होत राहील, त्यातून चांगलाच निर्णय होईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे उपस्थित होते.

पुणे

पुणे - स्वारगेटच्या जेधे चौकात ट्रान्स्पोर्ट हब बांधायला रस्तेविकास महामंडळापाठोपाठ आता महामेट्रोही उत्सुक आहे, तर एसटीलाही...

05.24 AM

पुणे - पहिली मुलगी झाल्यानंतर पुन्हा मुलगी नको म्हणणारा समाज, मुलगी झाली तर तिला मारून तिच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारे...

04.12 AM

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सत्ताधारी भाजपने पहिले पाऊल टाकले...

03.24 AM