पुण्याची प्रभागरचना शुक्रवारी होणार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांतील आरक्षणाच्या सोडतीबरोबरच पुण्याची प्रभागरचनाही येत्या शुक्रवारी म्हणजेच सात ऑक्‍टोबरला जाहीर होणार आहे. त्याचदिवशी सर्वच पक्षांतील विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे. सध्याचा कोणता प्रभाग कोणत्या नव्या प्रभागाला जोडला गेला, त्यावरून या नगरसेवकांच्या विजय-पराजयाची शक्‍यता ठरेल. त्यामुळे शुक्रवारपासूनच निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. 

 

पुणे - आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभागांतील आरक्षणाच्या सोडतीबरोबरच पुण्याची प्रभागरचनाही येत्या शुक्रवारी म्हणजेच सात ऑक्‍टोबरला जाहीर होणार आहे. त्याचदिवशी सर्वच पक्षांतील विद्यमान नगरसेवकांचे भवितव्य ठरणार आहे. सध्याचा कोणता प्रभाग कोणत्या नव्या प्रभागाला जोडला गेला, त्यावरून या नगरसेवकांच्या विजय-पराजयाची शक्‍यता ठरेल. त्यामुळे शुक्रवारपासूनच निवडणुकीच्या रणधुमाळीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे. 

 

प्रभागातील आरक्षणाची सोडत त्याचदिवशी (ता. ७) सकाळी ११ वाजता स्वारगेटजवळील गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे होणार आहे. सर्वांसाठी ती खुली असेल. तेथेच दर्शनी भागात सकाळी दहा वाजल्यापासून प्रभागरचनेचे नकाशे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती महापालिकेचे निवडणूक अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी दिली. शहरातील प्रत्येक प्रभागात दोन महिला व दोन पुरुष उमेदवार असतील. मात्र, प्रत्येकी तीन सदस्यसंख्या असलेल्या दोन प्रभागांतील एका प्रभागात दोन महिला उमेदवार असतील. 

 

हे प्रमाण आरक्षण आणि सोडतीनुसार ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रभागातील चारही जागांना प्रभाग क्रमांक १ ‘अ’, १ ‘ब’, १ ‘क’, १ ‘ड’ असे म्हणण्यात येईल.   
प्रभागाच्या आरक्षण सोडतीमध्ये सुरवातीला प्रत्येकी तीन सदस्यांच्या दोन प्रभागांतील महिलांचे आरक्षण सोडतीने निश्‍चित करण्यात येईल. त्यानंतर अनुसूचित जातींसाठीचे आरक्षण काढण्यात येईल. शहरातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमांकाने २२ प्रभाग तयार करण्यात आले आहेत. त्यातील पहिली जागा त्यासाठी राखीव असेल. (उदा.ः प्रभाग क्र. ५ व प्रभाग १० हे अनुसूचित जातींसाठी राखीव असल्यास त्यातील मधील ५‘अ’ व १० ‘अ’ हे प्रभाग राखीव असतील.); तसेच ११ प्रभाग अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राखीव असून, ते आरक्षण शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढून निश्‍चित करण्यात येईल. अनुसूचित जमातींसाठीच्या दोन राखीव जागांसाठीचे प्रभाग सोडतीने निश्‍चित होणार असून, त्यातील एक प्रभाग महिलांसाठी राखीव असेल. त्याच प्रभागातील पहिली जागा अनुसूचित जातींसाठी आरक्षित असल्यास दुसरी जागा अनुसूचित जमातींसाठी असेल व तिला ‘ब’ असे म्हटले जाईल. (उदा. ः प्रभाग ५ मधील ‘अ’ जागा अनुसूचित जातींसाठी, त्याच प्रभागात दुसरी जागा अनुसूचित जमातींसाठी आरक्षित झाल्यास ती ५ ‘ब’ असेल.)  

नागरिकांच्या मागासवर्गांसाठी (ओबीसी आणि भटके-विमुक्त) एकूण सदस्यसंख्येच्या २७ टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे १६२ सदस्यांपैकी एकूण ४४ जागा मागासवर्गासाठी आरक्षित असून, त्यातील २२ जागा महिलांसाठी असतील. त्यामुळे मागासवर्गासाठी सर्वंच म्हणजे ४१ प्रभागांत आरक्षण असेल. उर्वरित तीन जागांसाठी बिनराखीव राहिलेल्या असतील त्या जागांतून सोडतीने ते आरक्षण निश्‍चित करण्यात येईल. त्यामुळे तीन प्रभागांत मागासांच्या दोन जागा राहणार आहेत. मात्र, ज्या प्रभागात अनुसूचित जाती, जमातींचे आरक्षण नाही तेथे सोडतीने काढलेल्या तीन जागा मागासवर्गांतील महिलांसाठी थेट आरक्षित होतील. एखाद्या प्रभागातील पहिल्या दोन्ही जागा आरक्षित असल्यास तिसरी जागा मागासवर्गांसाठी आरक्षित होईल. (उदा.ः प्रभाग क्र. ५ ‘क’). सोडत काढल्यानंतर ज्या चार सदस्यांच्या प्रभागामध्ये २ जागा महिलांसाठी आरक्षित झालेल्या नाहीत, त्या प्रभागात ते प्रमाण पूर्ण करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या सर्वसाधारण महिलांच्या जागा नेमून दिल्या जातील.    

- ४१ प्रभाग- ३९ प्रभाग- प्रत्येकी चार सदस्यांचे, २ प्रभाग प्रत्येकी ३ सदस्यांचे- एकूण सदस्यसंख्या १६२
- महापालिका निवडणुकीसाठीची लोकसंख्या ः ३१ लाख ३२ हजार १४३ 
- प्रत्येक प्रभागातील किमान व कमाल लोकसंख्या ः ६९ हजार ५०० ते ८४ हजार ५०० 
- प्रभागरचना होणार उत्तर दिशेपासून ते दक्षिणेपर्यंत  

- प्रभागरचनेवरील हरकती- सूचना स्वीकारणार १० ते २५ ऑक्‍टोबरदरम्यान 
   येथे स्वीकारणार हरकती सूचना -
१) महापालिका भवन मुख्य इमारत 
२) सावरकर भवन महापालिका निवडणूक कार्यालय 
३) महापालिकेची सर्व म्हणजेच १५ क्षेत्रीय कार्यालये 

हरकतींची सुनावणी - ४ नोव्हेंबर रोजी 

Web Title: municipal ward structure

फोटो गॅलरी