अनैतिक संबंधाच्या संशयामुळे एकाचा खून

Murder
Murder

पिंपरी - अजंठानगर येथे पत्नीचे एकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने दोघांनी कोयत्याने वार करून खून केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने दोघांना अटक केली आहे. 

नंदू वसंत चव्हाण असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. 

विल्सन ऊर्फ अविनाश पतीराज डेमेंन्टी (वय २६, रा. गांगर्डेनगर, काटेपूरम चौक, पिंपळे गुरव) आणि दीपक देवेंद्र गवळी (वय १८, रा. गजानननगर, पिंपळे गुरव, नवी सांगवी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. 

नंदू याचे विल्सनच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय विल्सनला होता. यामुळे टपरीवर सिगारेट पीत थांबलेल्या नंदू वसंत चव्हाण याचा दोघांनी शुक्रवारी दुपारी खून केला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजंठानगर येथे खुनाची माहिती समजताच निगडी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तांत्रिक तपास केल्यानंतर आरोपी खेड तालुक्‍यातील आंबेगाव येथे गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे एक पथक आरोपींच्या मागावर निघाले. मात्र, पुणे-नाशिक महामार्गावर चाकणकडून मोशीच्या दिशेने दोघे जण तोंडाला कापड बांधून दुचाकीवरून जाताना दिसले. त्यांच्यावर संशय बळावल्याने पाठलाग करून चिंबळीजवळ त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसी खाक्‍या दाखवताच विल्सन याने दीपक यांच्या मदतीने खून केल्याचे कबूल केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com