सांगिसे, वडीवळे पूल पुन्हा पाण्याखाली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

नाणे - नाणे मावळ व परिसरामध्ये मंगळवारी दिवसभर व रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे सांगिसे पूल पुन्हा सलग चौथ्यांदा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नाणे - नाणे मावळ व परिसरामध्ये मंगळवारी दिवसभर व रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे सांगिसे पूल पुन्हा सलग चौथ्यांदा पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

नाणे मावळ या परिसरात काल दिवसभर व रात्री ते पहाटेपर्यंत पावसाचा जोर असल्याने नाणे मावळातील जनजीवन विस्कळित झाले. सांगिसे पूल पुन्हा पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडील सांगिसे, नेसावे, वळक, वेल्हवली, खांडशी, बुधवडी या गावांचा संपर्क तुटला आहे. दुग्ध व्यावसायिक व कामगार, शाळा व कॉलेजमध्ये जाणारे विद्यार्थी यांना याचा मोठा फटका बसत असून शिक्षकांना पुन्हा माघारी फिरण्याची नामुष्की होत आहे. तर काही नागरिक या पुलावरून जीव धोक्‍यात घालून प्रवास करत आहेत. हा पूल असाच नेहमी पाण्याखाली गेल्यास मोठा धोका निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने येथील नागरिक चिंता व्यक्त करत आहेत. लवकरात लवकर या पुलाची समस्या सोडविण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने विस्कळित झालेले जनजीवन पूर्वपदावर आले.

कामशेत - मुसळधार पावसामुळे मंगळवारी (ता. २९) रात्री वडीवळे पूल पाण्याखाली गेला. या वर्षी हा पूल सलग चार वेळा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे १२ ते १३ गावांतील नागरिकांना त्याचा फटका बसला.

नाणे मावळातील सांगीसे, बुधवडी वेल्हेवळी, नेसावे, खांडशी,उंबरवाडी व अन्य गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येतात. वाडीवळे येथे प्राचीन शंकराचे मंदिर असून राज्यभरातील हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या पुलाची उंची अत्यंत कमी आहे. त्यामुळे तो दर पावसाळ्यात तीन ते चार वेळा पाण्याखाली जातो. पान ८ वर 

‘वडिवळे’तून ४ हजार क्‍युसेकने विसर्ग 
कामशेतसह नाणे मावळात गेल्या तीन दिवसांपासून मुळधार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदी तुडुंब भरली आहे. वडिवळे धरण १०० टक्के भरले असून, धरणातून ४ हजार ६०० क्‍युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे.  नाणे मावळात एकूण ३ हजार मिलिमीटर पाऊस झाला असून, कालचा पाऊस १२५ मिलिमीटर झाल्याची नोंद आहे.