टोमॅटोची १२५ कोटींची उलाढाल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

नारायणगावात उच्चांकी भावामुळे गतवर्षीपेक्षा ४३ कोटींची वाढ
नारायणगाव - जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो उपबाजारात हंगामात (एप्रिल ते ऑगस्ट) ३० लाख ९ हजार ७८० टोमॅटो क्रेटची (एक क्रेट ः २० किलो) आवक झाली. टोमॅटोच्या खरेदी विक्रीतून उपबाजारात १२५ कोटी ३ लाख ३७ हजार ८२५ रुपयांची उच्चांकी उलाढाल झाली. या वर्षी जून व जुलै महिन्यात टोमॅटोला उच्चांकी भाव मिळाले. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उलाढालीत तब्बल ४३ कोटी १७ लाख ६५ हजार ३२५ रुपयांची वाढ झाली आहे.

जुन्नर व आंबेगाव तालुक्‍यातील या वर्षीचा एप्रिल ते ऑगस्टदरम्यानचा पावसाळी व उन्हाळी टोमॅटोचा तोडणी हंगाम संपुष्टात आला आहे. नारायणगाव येथील उपबाजारात मागील वर्षी एप्रिल २०१६ ते ऑगस्ट २०१६ दरम्यानच्या हंगामात २३ लाख २५ हजार २९० टोमॅटो क्रेटची आवक झाली. टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार दोनशे रुपये ते सातशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. टोमॅटोच्या खरेदी विक्रीतून ८१ कोटी ८५ लाख ७२ हजार ५०० रुपयांची उलाढाल झाली. या वर्षी उपबाजारात एप्रिल २०१७ ते ऑगस्ट २०१७ दरम्यानच्या हंगामात ३० लाख ९ हजार ७८० टोमॅटो क्रेटची आवक झाली.

टोमॅटो क्रेटला प्रतवारीनुसार पन्नास रुपये ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. टोमॅटोच्या खरेदी विक्रीतून १२५ कोटी ३ लाख ३७ हजार ८२५ रुपयांची उलाढाल झाली. गतवर्षीच्या हंगामाच्या तुलनेत या वर्षी उपबाजारात ४३ कोटी १७ लाख ६५ हजार ३२५ रुपयांची जास्त उलाढाल झाली. सध्या उपबाजारात दहा ते बारा हजार टोमॅटो क्रेटची आवक होत असून, टोमॅटोच्या बाजारभावात घट झाली असून, क्रेटला शंभर ते दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.

जुलै महिना फायदेशीर
उपबाजारात या वर्षी जुलै महिन्यात ७ लाख ९४ हजार ३६५ टोमॅटो क्रेटची आवक झाली. क्रेटला प्रतवारीनुसार पाचशे रुपये ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान उच्चांकी भाव मिळाला. खरेदी विक्रीतून जुलै महिन्यात ६३ कोटी ७९ लाख ५ हजार ५०० रुपयांची उच्चांकी उलाढाल झाली. या वर्षी जुलै महिना टोमॅटो उत्पादकांना फायदेशीर ठरला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी दिली.

Web Title: narayangaon pune news tomato 125 crore transaction