मोदी IPL मधले कॅप्टन; मीही चांगला बॅट्समन : आठवले

गुरुवार, 19 एप्रिल 2018

पुणे : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मोदी सरकारच्या वतीने जोरदार बॅटिंग करत नरेंद्र मोदी हे आपयपीएल टीमचे कर्णधार असल्याचा दावा केला. तसेच आपण स्वतः चांगले फलंदाज असून, मोदी  हे २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पुणे : केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज मोदी सरकारच्या वतीने जोरदार बॅटिंग करत नरेंद्र मोदी हे आपयपीएल टीमचे कर्णधार असल्याचा दावा केला. तसेच आपण स्वतः चांगले फलंदाज असून, मोदी  हे २०१९ मध्ये पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली. नरेंद्र मोदी हे कणखर पंतप्रधान आहेत.  काँग्रेस सरकारच्या काळात प्रलंबित असलेले प्रश्न मोदींनी मार्गी लावले. देशात जातियवाद जिवंत राहिला. यासाठी काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. काॅग्रेस २०१९ च्या निवडणुकीत १०० च्या पुढे जाणार नसल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणाविषयी बोलताना ते म्हणाले,`` संभाजी भिडे हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. ते दोषी असतील तर त्यांना पकडा. त्यांच्या सहभागाविषयी गांभीर्याने तपास करा.``

बढत्यांमधील आरक्षणासाठी कायदा करण्याची केंद्र सरकारकडे मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक  कायद्याला धक्का लावण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाला नाही, असे मत व्यक्त करून गरज पडल्यास केंद्राने वटहुकूम काढावा, अशी मागणी त्यांनी केली.  धनगर समाजाला अनुसूचित जमातींप्रमाणे आरक्षण मिळावे, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला.

शिवसेना आणि भाजप एकत्र आले तर मी कुठूनही निवडून येऊ शकतो, असाही दावा त्यांनी केला. रिपब्लिकन ऐक्य हा समाजासाठी भावनेचा मुद्दा आहे. बिग बॉस` या टिव्ही रिअॅलिटी शोमध्ये जाण्यासाठी आता मला वेळ नाही. मीच बिग बॉस असल्याचा टोला त्यांनी लगावला.

Web Title: Narendra Modi will form government in 2019, predicts Ramdas Athawale