नवलाखउंब्रे, मिंडेवाडी, करंजविहीरे रस्त्यांची चाळण

rasta.jpg
rasta.jpg

टाकवे बुद्रुक : मावळ आणि खेड तालुक्याला जोडणारा नवलाखउंब्रे, मिंडेवाडी, करंजविहीरे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याने चारचाकी वाहनातून प्रवास करा किंवा दुचाकीवरून घरी पोहचल्यावर गरम पाण्याने अंघोळ करून चार तास विश्रांतीच घ्यावी लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणावर या रस्त्याला खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकून पुढे जायचे हा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे.
 
सकाळच्या संबधित प्रतिनिधीने या रस्त्याच्या प्रवास करीत हा अनुभव घेतला आहे. तळेगाव दाभाडे औद्योगिक वसाहतीचा रस्ता संपल्यावर नवलाखउंब्रे गावात पोहचताक्षणी खड्डे पडलेला रस्ता आपले उत्साहाने स्वागत करतो. त्यापुढे गेल्यावर पेट्रोलपंप ओलांडून पुढे जातो ना जातो तोच खड्ड्यात आदळून आपटून पाठीची हाडे ऐकामेंकाशी बोलू लागतात. 

तेथेच जवळ असलेला लहान पूल म्हणा किंवा मोरी म्हणा आता हा पूल पडतो की काय, अशी भीतीच छातीत धस करायला लावते. पूलाच्या दोन्ही बाजूला तडे जाऊन धोकादायक असल्याची जाणीव होते. तेथे इतके खड्डे पडले आहेत की विचारता सोय नाही. याच पूलावर ऑईल मिश्रित पाण्याचा थर पसरला आहे. त्यामुळे गाडी स्लीप होण्याची शक्यता नाकरता येत नाही. 

या पुलाच्या पुढे जीवमुठीत धरून पलिकडे आलो की, मग बधालेवाडी, मिंडेवाडीची खिंड ओलांडून पलिकडे जाई पर्यत लक्ष विचलित करून जाऊ नका. नाहीतर मोठ्या खड्ड्यात दुचाकीवरून कधी खाली पडाल याचा नियम नाही. चारचाकीने जात असल्यास जराही बेसावध राहू नका. अलिकडच्या दिशेने किंवा पलीकडील दिशेने येणारा दुचाकीस्वार चारचाकीवर कधी आदळेल याचा भरवसा नाही. या मार्गाने वाहतूक वाढली आहे, खेड तालुक्यातील पश्चिम भागातील पाईट, कडूस, देशमुखवाडी, तोरणे, वाशेरे, औदर, गडद परिसरातील नागरिक मुंबईला जाताना धामणे मार्गे येत जात आहे. करंजविहीरे पंचक्रोशीतील अनेक तरूण याच मार्गे तळेगाव औद्योगिक वसाहतीत नोकरीला येत आहे. काही दुग्धव्यवसायिक, महाविद्यालयीन विद्यार्थी देखील येतात. खेडकरांचे जसे अलिकडे येणे असते, तसे मावळ वासियांचे देखील पलिकडे जाणे असते. 

विक्रम कदम व जालिंदर शेटे म्हणाले, " रस्त्याची अक्षरश चाळण झाली आहे, वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागते. अवजड वाहने मिंडेवाडीला गेल्याने खड्डे अधिक मोठे झाले, त्यावर भराव टाकला नाही किंवा दुरुस्ती केली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची पाहणी करून दुरूस्तीसाठी पावसाळ्यात किमान मुरूम मातीचा भराव तरी टाकावा. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com