"महिला सक्षमीकरण, सुरक्षिततेवर भर देणार' 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

वडगाव शेरी - ""वडगाव शेरी भागातील महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन स्वावलंबी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. तसेच प्रभागात सर्वत्र सीसीटीव्ही बसवून सुरक्षित वातावरण निर्माण केले जाईल,'' असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार प्रकाश गलांडे आणि नारायण गलांडे यांनी दिले. 

वडगावशेरी-कल्याणीनगर(प्रभाग पाच)मधील उमेदवार प्रकाश गलांडे, नारायण गलांडे, अलका कांबळे, शिल्पा गलांडे यांनी पदयात्रा आणि रॅली काढून प्रचार केला. या वेळी अनेक पदाधिकारी, तरुण व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 

प्रकाश गलांडे आणि नारायण गलांडे म्हणाले, ""राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महिला सबलीकरणासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. महिलांना आरक्षण मिळावे यासाठी कायदा केला. राजकारणातही महिलांना आरक्षण मिळवून दिले. आज देशात महिलांना सर्व क्षेत्रांत समान संधी मिळाली असून, त्यांची प्रगती झाली आहे.'' 

शिल्पा गलांडे आणि अलका कांबळे म्हणाल्या, ""राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून प्रभागात महिलांसाठी विशेष व्यवसाय प्रशिक्षण वर्ग आणि उत्पादक मालासाठी विक्री केंद्रे उभारले जातील. प्रभागात माजी नगरसेवक प्रकाश गलांडे याच्या माध्यमातून सैनिकवाडी येथे महिलांसाठी हॉल बांधण्यात आला असून, त्याचा उपयोग महिलांना विविध व्यवसाय प्रशिक्षणासाठी होत आहे.'' 

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह 
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभेमुळे प्रभागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. त्यामुळे पक्षाची प्रचारात आघाडी दिसून येत आहे. सोमवारच्या रॅलीत ते स्पष्ट दिसून आले. तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रॅली काढली.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): भारत देश हा विविध जाती धर्म व संस्कृतीने जगात आगळावेगळा म्हणून ओळखला जातो. स्व. माजी राष्ट्रपती...

02.30 PM

जुन्नर : शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील प्रसाद थोरवे यांच्या घरात घुसलेल्या सुमारे सहा फूट लांबीच्या नागास जुन्नर येथील सर्प...

02.09 PM

खडकवासला : टेमघरमार्गे लवासाकडे जाणाऱ्या घाटात मंगळवारी एका मिनीबसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. झाड व कठड्यात बस अडकल्याने...

08.30 AM