पदयात्रेने राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

कात्रज - महापालिका निवडणुकीसाठी धनकवडी-आंबेगाव पठार प्रभागातील (क्र. 39) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आणि नगरसेवक विशाल तांबे, तसेच बाळासाहेब धनकवडे, श्रद्धा परांडे आणि अश्‍विनी भागवत यांच्या प्रचाराचा प्रारंभ भव्य पदयात्रा काढून नुकताच करण्यात आला. प्रभागातील नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

कात्रज - महापालिका निवडणुकीसाठी धनकवडी-आंबेगाव पठार प्रभागातील (क्र. 39) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आणि नगरसेवक विशाल तांबे, तसेच बाळासाहेब धनकवडे, श्रद्धा परांडे आणि अश्‍विनी भागवत यांच्या प्रचाराचा प्रारंभ भव्य पदयात्रा काढून नुकताच करण्यात आला. प्रभागातील नागरिक यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

धनकवडीतील जानूबाई मंदिरापासून पदयात्रेला प्रारंभ झाला. त्या प्रसंगी बापूसाहेब धनकवडे, दत्तात्रेय धनकवडे, श्रीरंग आहेर पाटील, भाऊ महाराज परांडे, शंकर पाटील, मधुकर नवले, संतोष फरांदे, शांताराम धनकवडे आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिरापासून शिवशंकर चौक, राम मंदिर, आंबेगाव पठार, धनकवडी गाव व शिवाई देवी मंदिरमार्गे चैतन्यनगरमध्ये या पदयात्रेची सांगता झाली. पदयात्रेत ठिकठिकाणी तांबे, धनकवडे, परांडे व भागवत यांचे महिलांकडून औक्षण करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्यही या प्रसंगी उपस्थित होते. तसेच महिलांचीही उपस्थितीदेखील लक्षणीय होती. 

धनकवडी टपाल कार्यालयाजवळ उभारण्यात आलेले शरदचंद्र बहुउद्देशीय भवन, पीआयसीटीजवळील रस्ता रुंदीकरण व चैतन्यनगरमध्ये साकारण्यात येत असलेले उद्यान इत्यादींबाबतची माहिती या वेळी मतदारांना देण्यात आली. तांबे यांनी गेल्या पाच वर्षांत साकारलेल्या विकासकामांचीही माहितीही अहवालाद्वारे या वेळी देण्यात आली. 

तांबे म्हणाले, ""धनकवडी, चैतन्यनगर परिसरात गेल्या पाच वर्षांत अनेक विकासकामे झाली आहेत. स्वारगेटपर्यंतची मेट्रो कात्रजपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच सद्‌गुरू शंकर महाराज उड्डाण पूल उभारण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता केली आहे. आगामी काळात परिसरात सुसज्ज रुग्णालय, नाट्यगृह व ई- लर्निंग स्कूल साकारण्यात येईल.'' 

पुणे

पुणे : भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असेल आणि याचे पुरावे असतील तर, खरं काय ते लोकांसमोर यायला...

04.24 PM

पिंपरी : औद्योगिक क्‍लस्टर विकासात दहा वर्षानंतरही उदासीनता राहिल्याची कबुली केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री...

04.00 PM

जुन्नर : जुन्नर तहसील कार्यालयातील अभिलेख कक्ष आज (बुधवार) कार्यालयीन वेळेत बंद असल्याने विविध गावातून येथे कामासाठी आलेल्या...

03.21 PM