राष्ट्रवादीचे टोल नाका बंद आंदोलन

NCP Toll Naka Bandh protest
NCP Toll Naka Bandh protest

जुन्नर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता.15) भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांसह नाशिक पुणे महामार्गावरील चाळकवाडी ता.जुन्नर येथील टोल बंद आंदोलन झाले.

यावेळी बेनके म्हणाले, आळेफाटा, नारायणगाव, कळंब, मंचर, खेड बाह्यवळणाचे तसेच खेड घाटाचे अपूर्ण अवस्थेत बंद पडलेले काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्या सर्व बाधीत शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी. दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी निर्माण झाल्यामुळे अनेक तास गाड्या जागेवरच उभ्या असतात. रुग्णवाहिकेला जाण्यासाठी देखील अनेकदा जागाच उपलब्ध नसते.

टोल नाक्या शेजारी राहणाऱ्या शेतकऱ्यांना येथील गाड्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच टोलनाक्यावरील ठेकेदारा समवेत चर्चा केली असता त्यात स्थानिक आमदारांच्या अवास्तव मागण्यामुळे आम्ही त्रस्त झालो असल्याचे समजले. 

ते पुढे म्हणाले, आज आम्ही आंदोलन करण्याच्या अगोदरच आमदारांनी टोल नाका बंद केलाय. आता कायमस्वरूपी टोल नाका बंद करण्याची जबाबदारी आमदारांची आहे. तसेच मी रस्त्याचे काम पूर्ण करून घेणार आहे. बाधीत शेतकऱ्यांना भुसंपादन कार्यालयात घेऊन जाण्यासाठी माझी स्वतःची गाडी ठेवणार आहे. आमदारांनी केलेले आंदोलन हे कायदेशीर नसल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपळवंडी येथील आमदारांच्या रायगड या बंगल्याचे 1 लाख 60 हजार 470 रुपये महावितरणचे बिल थकीत आहे. हे पुराव्यासह त्यांनी सर्वांना दाखवले व अधिकाऱ्यांना आम्ही त्यांच्या बंगल्याचा वीज पुरवठा का खंडित केला नाही असे विचारले असता ते दमदाटी करतात असे सांगितले. 
यावेळी राष्ट्रवादीचे गटनेते शरद लेंडे यांनी प्रास्ताविक केले. देवदत्त निकम, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी शासनाला दिलेले निवेदन वाचुन दाखवले. मारुती वायाळ, गुलाब नेहरकर, सूरज वाजगे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com