आंबेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

आंबेगावात राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा

घोडेगाव - आंबेगाव तालुक्‍यातील ९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद यश संपादन केले आहे. ९ पैकी ९ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आल्याचा दावा पक्षाचे तालुका अध्यक्ष ॲड. विष्णू हिंगे यांनी केला आहे. मात्र सुपेधर, कानसे व पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे सरपंचपदासाठी काट्याची टक्कर झाली. 

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते.

आंबेगाव तालुक्‍यात या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला चितपट केले आहे. अवसरी बुद्रुक येथे सेनेला १३ पैकी पाच जागा, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक येथे सेनेला ३ जागा मिळाल्या. कानसे येथे राष्ट्रवादीचे सरपंच पदाचे उमेदवार राजू लोहकरे अवघ्या १० मतांनी विजयी झाले. सुपेधर येथे ७५ वर्षांच्या आजीबाई लक्ष्मीबाई भवारी ५१ मतांनी निवडून आल्या. 

ग्रामपंचायतनिहाय निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे - अवसरी बुद्रुक - पवन हिले (सरपंच), गेनभाऊ हिंगे, स्वप्नील हिंग, माया टाव्हरे, सचिन हिंगे, ललिता गायकवाड, प्रशांत वाडेकर, आशा चव्हाण, स्वप्नील बांबळे, वसुधा वाघमारे, शीतल हिंगे, मनीषा फल्ले, कोमल हिंगे, अजित चव्हाण.

लोणी - ऊर्मिला धुमाळ (सरपंच), सावळेराम नाईक, राणी गायकवाड, अरुणा खंडागळे, सुरेखा थोरात, माधुरी गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, अनिल पंचरास, ज्योती जंगम, रवींद्र रोकडे

तांबडेमळा - ज्ञानेश्वर भोर (सरपंच), धनश्री तांबडे, संतोष तांबडे, छाया भोर, मीरा भोर, शिवाजी तांबडे, तर नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या दोन जागा रिक्त राहिल्या.

चपटेवाडी - संदीप चपटे (सरपंच), गणेश चपटे, आशा चपटे, दीपक चपटे, नीता चपटे, शिवाजी चपटे तर अनुसूचित जमाती स्त्रीच्या दोन जागा रिक्त राहिल्या.

पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक - बबन ढोबळे (सरपंच), दिलीप लोखंडे, सुनंदा ढोबळे, कविता दातखिळे, छाया बढेकर, सुवर्णा ढोबळे, किरण ढोबळे, सचिन देवडे, शीतल ढोबळे, किरण ढोबळे, सचिन अस्वारे, पुष्पा चांगण, विठ्ठल ढोबळे, भाग्यश्री कोल्हे, शोभा लबडे, दत्तात्रय सैद

टाव्हरेवाडी - उत्तम टाव्हरे (सरपंच), शुभांगी टाव्हरे, निर्मला टाव्हरे, भरत टाव्हरे, अनिल चव्हाण, सानिका टाव्हरे, महेश टाव्हरे तर अनुसूचित जमातीची स्त्रीची जागा रिक्त राहिली.

सुपेधर - लक्ष्मीबाई भवारी (सरपंच), कांताबाई तारडे, मनोज कोकणे, मंगल लोहकरे, बारकू केंगले, उज्ज्वला साळवे, शंकर गांगड, मंदाबाई कोकणे

कानसे - राजू लोहकरे (सरपंच), बेबी गाडेकर, दत्तात्रय बोऱ्हाडे, सविता वाळुंज, अंकुश धादवड, आशा बोऱ्हाडे, दिनकर सुपे, संगीता बोऱ्हाडे

फुलवडे - मनीषा नंदकर (सरपंच), कुसुम गभाले, जयश्री गभाले, सोमनाथ जंगले, आशा भारमळ, श्‍यामकांत बांबळे, संदीप भारमळ, सोनाली डगळे, फसाबाई मोहरे, आदिनाथ हिले

डिंभे बुद्रुक बिनविरोध - डिंभे बुद्रुक ही एकमेव ग्रामपंचायत माघारीमध्येच बिनविरोध झाली आहे. या ग्रामपंचायतीवर मीराबाई दत्तात्रय साबळे (सरपंच), पुष्पा साबळे, मार्तंड शेळके, आम्रपाली साळवे, यशवंत साबळे, प्रदीप आमुंडकर, संध्या डोंगरे तर अनुसूचित जमाती स्त्रीची जागा रिक्त राहिली. 

पोटनिवडणूक निकाल
पोटनिवडणुकीत खडकवाडी ग्रामपंचायतीवर वैभव सुक्रे, तळेघर ग्रामपंचायतीवर सविता शेळकंदे, भावना मोरमारे, शेवाळवाडी ग्रामपंचायतीवर संजीव थोरात, साल ग्रामपंचायतीवर देवकी पारधी, जाधववाडी ग्रामपंचायतीवर काशिनाथ जाधव, फलोदे ग्रामपंचायतीवर रुक्‍मिणी मेमाणे, प्रमिला मेमाणे, दत्तात्रय मेमाणे, ऊर्मिला मेमाणे तिरपाड ग्रामपंचायतीवर नंदा आंबवणे, आहुपे ग्रामपंचायतीवर सोनाबाई असवले, पिंपरगणे ग्रामपंचायतीवर सखूबाई पारधी, अरुणा काठे, वनश्री काढे, भागडी ग्रामपंचायतीवर बाळू उंडे यांची निवड झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com