जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच पुन्हा ‘दादा’!

- गजेंद्र बडे 
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसद ते पालिका या आवाहनाला पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मतदारांनी मात्र त्यांचे आवाहन साफ धुडकावून लावले आहे. विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपला साथ द्या, आम्ही विकास करू, हे माझे शब्द आहेत, असे वचनही मुख्यमंत्री जाहीर सभांमधून देत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचे आवाहन, आश्‍वासन आणि वचन याकडे साफ दुर्लक्ष करत जिल्ह्यातील जनतेने पुन्हा एकदा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसलाच पसंती दिली आहे. 

राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणुका भाजपने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिष्ठेच्या केल्या होत्या. या पायी या निवडणुकीत प्रसंगी कोणत्याही स्तराला जाऊन अधिकाधिक जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि आणि महापालिकांची सत्ता भाजपकडे खेचून आणण्याचा चंगही त्यांनी बांधला होता. त्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वरवंड (ता. दौंड), उरुळी कांचन व वाघोली (दोन्हीही ता. हवेली) या तिन्ही ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. या तीनही ठिकाणचे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे भाजपचे सर्व उमेदवार मोठ्या फरकाने पराभूत झाले आहेत. मतदारांनी भाजपला नाकारल्याने त्यांचा पुणे जिल्हा परिषदेत सत्तेवर येण्याचा वादा हवेतच विरला गेला आहे. 

पुणे जिल्हा परिषदेचे एकूण ७५ सदस्य आहेत. सत्तेत येण्यासाठी स्वपक्षीय किमान ३८ सदस्य निवडून येणे अनिवार्य आहे. इतके सदस्य निवडून आले तरच या जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करता येते; अन्यथा नाही. या जिल्हा परिषदेच्या मावळत्या सभागृहात भाजपचे केवळ तीनच सदस्य निवडून आलेले आहेत. तेही सर्व मावळ या एकाच तालुक्‍यातील. यंदाच्या निवडणुकीत या बालेकिल्ल्यातील सर्वच्या सर्व म्हणजे पाचही जागा जिंकू, असा विश्‍वास भाजपला होता. भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे याच तालुक्‍याचे आमदार आहेत. याशिवाय शिरूरला भाजपचेच आमदार आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अर्धा भाग येत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदारही भाजपचेच आहेत. या पार्श्‍वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेची सत्ता आपण नक्कीच हस्तगत करू शकू, असा आत्मविश्‍वास पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे, आमदार बाबूराव पाचर्णे आदी नेत्यांना होता. त्यांचा हा आत्मविश्‍वास जिल्ह्यातील मतदारांनी फोल ठरविला. 

भाजप आमदार पुत्राचा पराभव 
भाजपचे शिरूरचे आमदार बाबूराव पाचर्णे यांचे चिरंजीव राहुल पाचर्णे यांचा जिल्हा परिषदेच्या शिरूर ग्रामीण-न्हावरा या गटातून पराभव झाला. विशेष म्हणजे ते जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य आहेत. याआधीची जिल्हा परिषद निवडणूक त्यांनी स्थानिक आघाडीच्या उमेदवारीवर लढवून ती जिंकली होती. यंदा त्यांना राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र जगदाळे यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. 

जिल्हाध्यक्षांच्या तालुक्‍यातही घट 
भाजप जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांच्या मावळ तालुक्‍यातून भाजपचे तीन सदस्य जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत याच तालुक्‍यात पक्षाच्या जागेत पान ७ वर 

Web Title: ncp in zp success