नवीन आकृतीबंध त्वरित लागू करावा : शिवाजीराव खांडेकर

मिलिंद संधान
बुधवार, 18 एप्रिल 2018

पुणे : "शाळेतील दैनंदिन प्रशासकीय कामासाठी आवश्यक असणारे लिपिक व प्रशालेतील स्वच्छतेसाठी आवश्यक असणाऱ्या सेवकांची गरज लक्षात घेता शासनाने त्वरित नवीन आकृतीबंध लागू करावा," असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे सहकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी दापोडी येथे केले.

जनता शिक्षण संस्थेच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ब्लॉसम इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये आयोजित केलेल्या मार्गदर्शनपर सभेत ते उपस्थित कर्मचाऱ्यांसमोर बोलत होते. खांडेकर यांना नुकतेच ब्रेन इंडिया फाऊंडेशनच्या वतीने विद्यासेवा पुरस्काराने गौरविल्याबद्दल कार्यक्रमाचे अध्यक्ष व पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक ग्रंथपाल संघटनेचे अध्यक्ष शंकर घोरपडे, पुंडलिक रासकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

खांडेकर म्हणाले, "अर्धवेळ ग्रंथपाल ही संकल्पना बंद करून शाळा तेथे पूर्णवेळ ग्रंथपाल नेमणूक केली पाहिजे. 2005 पासून बंद असलेली शिक्षकेतर भरती उठवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कित्येक शाळांमध्ये वीस पंचवीस वर्षे अर्धवेळ ग्रंथपाल काम करूनही त्या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ केले जात नाही. "

जिल्हा परिषद किंवा शासनाच्या इतर खात्यात 24 वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याला निवड श्रेणी दिली जाते ती शिक्षकेतरांनाही लागू करावी असा पाठपुरावा करण्याची मागणी जनता शिक्षण संस्थेतील कर्मचाऱ्यांनी शिवाजीराव खांडेकर यांच्याकडे केली.

प्रास्ताविक अतुल सोरटे यांनी केले तर आभार सुधीर बहिरट यांनी मानले.

Web Title: Need full time staff in schools, says Shivajirao Khandekar