पुणे - जुन्नर येथील नगदवाडीजवळ आढळले नवजात अर्भक

दत्ता म्हसकर
सोमवार, 23 एप्रिल 2018

जुन्नर (पुणे) : नगदवाडी (कांदळी -ता.जुन्नर) येथे प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेऊन दिलेले नवजात अर्भक आढळले आहे. येथील शिवशंकर मांडे यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ रविवारी (ता. 22) सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आल्याने तेथे काम करणारे रवी चव्हाण यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता, त्यांना एका प्लॅस्टीकच्या पिशवीमध्ये ठेवलेले स्त्री जातीचे अंदाजे दोन तीन दिवसांचे नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले.

ग्रामस्थांनी बाळाच्या पालकांचा परिसरात सर्वत्र शोध घेतला मात्र संबंधित कोणीच मिळून आले नाही कांदळीचे पोलीस पाटील अरूण भालेराव व त्यांच्या सहकाऱ्यांनी नारायणगाव पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच
बाळाला उपचारासाठी नारायणगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. याबाबत अज्ञात व्यक्ती विरूध्द नारायणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला असून अधिकचा तपास पोलिस करीत आहेत.    

Web Title: new born baby found in junnar pune