कोरेगाव पार्क परिसरात 15 लाखांच्या नव्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

पुणे - चलनातून बंद झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा घेण्यासाठी आलेल्या चार जणांना कोरेगाव पार्क पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून 14 लाख 75 हजारांची रोकड जप्त केली असून, त्यात नव्या दोन हजार, पाचशे आणि शंभराच्या नोटांचा समावेश आहे.

बापूसाहेब गुलाबराव येवले (वय 58, रा. चोवीसावाडी, चऱ्होली), महावीर दत्तात्रेय पिसाळ (वय 53, रा. मोरे वस्ती, चिखली), नानासाहेब शिवाजी क्षीरसागर (वय 25, रा. थिटेवस्ती, खराडी) आणि विशाल अण्णासाहेब राहणे (वय 32, रा. जेजुरी, ता. पुरंदर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क परिसरात चौघे जण येणार असून, त्यांच्याकडे दोन हजार आणि पाचशेच्या नव्या नोटा आहेत. ते जुन्या नोटा घेऊन 20 टक्के दराने बदलून देत असल्याची माहिती कोरेगाव पार्क पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रजपूत डेअरी परिसरात सापळा रचून मोटारीतून आलेल्या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे 14 लाख 75 हजार रुपयांच्या नव्या नोटा आढळून आल्या. त्यात दोन हजारांच्या 716 नोटा, पाचशे रुपयांच्या 43 आणि 100 रुपयांच्या 210 नोटा होत्या. पोलिसांनी ही रक्कम जप्त करून प्राप्तिकर विभागाला कळविले आहे.

पुणे

पुणे -  असे जगावे दुनियेमध्ये,  आव्हानाचे लावून अत्तर...  नजर रोखुनी नजरेमध्ये,  आयुष्याला द्यावे उत्तर...

03.48 AM

पुणे- एकुलती एक मुलगी लग्नानंतर सासू- सासऱ्यांसह आई-वडिलांचीही काळजी घेत, दोन घरे सांभाळण्याची किमया साधते आणि कर्तृत्त्वाचा...

03.48 AM

पुणे - अमेरिकेत राहणाऱ्या मुलाशी रोजचा संवाद साधायला अनंत कुलकर्णी यांना रोज अडचणी यायच्या...मग, त्यांच्या मनात विचार आला की...

03.03 AM