नवीन गॅसधारकांना मोफत शेगडी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 एप्रिल 2017

पुणे - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या (एमएनजीएल) ग्राहकसंख्येत वाढ करण्यासाठी पेट्रोलियम कंपन्या नवीन गॅसधारकांना मोफत शेगडी, गॅस कनेक्‍शन घेताना अनामत रकमेमध्ये किंवा जोडणी आकारामध्ये सवलत, गॅस एजन्सीला प्रोत्साहन भत्ता; तसेच पेट्रोल पंपांवर नॅचरल गॅस कनेक्‍शन फॉर्म भरल्यावर एक लिटर पेट्रोल मोफत देणे आदी सवलती देणार आहे. 

या संदर्भात पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली एमएनजीएल, भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसह शासकीय अधिकाऱ्यांची विधान भवन, कौन्सिल हॉल येथे आढावा बैठक झाली. या बैठकीला पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे, जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालदार, "एमएनजीएल'चे मिलिंद दखोले, सुधीर फरतरे, कार्तिक टिक्कू, विनीत कुमार यांच्यासह विविध पेट्रोलियम कंपन्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. चोक्कलिंगम म्हणाले, ""सध्या पुण्यात एमएनजीएलचे दीड लाख गॅसधारक आहेत. एमएनजीएलच्या गॅस वापरासाठी वृत्तपत्र, रेडिओ चॅनेल्सवरून जनजागृती करण्यात येत आहे.'' 

"एमएनजीएल'ने वितरकांना सामावून घ्यावे 
एमएनजीएलकडून पाइपलाइनमधून पुरवल्या जाणाऱ्या गॅसचा वापर वाढल्यास पारंपरिक गॅस सिलिंडरचा व्यवसाय कमी होण्याची भीती काही एलपीजी गॅस व्यावसायिकांनी या बैठकीत व्यक्त केली. त्यावर संबंधित सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या व्यवस्थापकांची बैठक घेऊन "एमएनजीएल'ने अन्य वितरकांना व्यवसायात सामावून घ्यावे, अशी सूचना करण्यात आली. तसेच चालू वर्षामध्ये अधिकाधिक "सीएनजी स्टेशन्स' सुरू करून पेट्रोल विक्रीमध्ये दहा टक्‍क्‍यांनी घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले पाहिजे, असेही विभागीय आयुक्तांनी सर्व पेट्रोलियम कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले. 

Web Title: New gas holder stove Free