रेल्वेकडून नवीन गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

पुणे - रेल्वेच्या नवीन वेळापत्रकानुसार पुणे रेल्वे स्टेशनवरून अहमदाबाद-चेन्नई एक्‍स्प्रेस, श्री गंगानगर-तिरुच्चिरापल्ली एसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेस, पुणे-अमरावती एसी एक्‍स्प्रेस या नवीन गाड्या सुटणार आहेत, तर यापूर्वी आठवड्यातून तीन दिवस धावणारी एक गाडी आता सहा दिवस धावणार आहे. त्यामुळे पुणेकरांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. 

देशभरातील रेल्वेच्या सर्व विभागांचे नवीन वेळापत्रक दरवर्षी एक ऑक्‍टोबरपासून लागू होते. त्यानुसार मध्य रेल्वेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले असून, त्याची अंमलबजावणी शनिवारपासून (ता.१) सुरू झाली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुण्यावरून अहमदाबाद-चेन्नई एक्‍स्प्रेस (साप्ताहिक), श्री गंगानगर-तिरुच्चिरापल्ली एसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेस (साप्ताहिक), पुणे-अमरावती एसी एक्‍स्प्रेस या नवीन गाड्यांचा समावेश आहे. तर, पुणे-हुजूर साहिब नांदेड ही आठवड्यातून तीन वेळा धावणारी गाडी यापुढे सहा दिवस धावणार आहे. पुणे-अजनी (नागपूर) ही गाडी बुधवारऐवजी शुक्रवारी सुटणार आहे. तसेच, नागपूर-पुणे एक्‍स्प्रेस यापुढे अजनी स्टेशनवरून सुटणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस-सोलापूर एक्‍स्प्रेसला सुपरफास्ट एक्‍स्प्रेस घोषित करण्यात आले आहे.