लाइव्ह पेजवर नववर्षाचा जल्लोष

लाइव्ह पेजवर नववर्षाचा जल्लोष
लाइव्ह पेजवर नववर्षाचा जल्लोष

पुणे - ‘बघता बघता वर्ष सरलं... या वर्षीच्या आठवणी घेऊन आता २०१७ वर्षामध्ये पदार्पण करायचंय...नवी स्वप्न, नव्या आशा, आकांक्षा अन्‌ मनात जिद्द घेऊन पुन्हा लढायचेय... त्यासाठी नवे पर्व, नवे हर्ष नांदो हीच सदिच्छा...’ अशा शुभेच्छा संदेशांचा वर्षाव शनिवारी (ता. ३१) सकाळपासूनच सोशल नेटवर्किंग साइट्‌सवर होत आहे. सरत्या वर्षात काय मिळालं, सरत्या वर्षाने काय दिलं, याचा उलगडा करत काहींनी २०१७ साठी केलेले संकल्प सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तरुणांकडून नववर्षाचे स्वागत ३१ डिसेंबरपासूनच सुरू झाले आहे.

‘जीआयएफ’चा धडाका
शुभेच्छा देणारे संदेश, छायाचित्रे व कार्टून पाठवून तरुणांकडून सोशल मीडियावर नववर्षाचे उत्साहात स्वागत होत आहे. न्यू इयरचे संदेश देणारे ३० सेकंदांचे ग्राफिक्‍स इंटरचेंज फॉर्मेट (जीआयएफ) फेसबुकवर आणि व्हॉट्‌सॲपवर नेटिझन्स शेअर करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जुन्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी फेसबुकच्या भिंती रंगल्या आहेत. नेटिझन्सकडून आपले फेसबुक वॉल पाठविण्यात येत असून, सरते वर्ष कसे होते आणि येत्या काळातील संकल्प कोणते? याचा उलगडा काहींनी फेसबुक वॉलवर केला आहे. काहींनी भटकंती करण्याचे, काहींनी अभ्यास करण्याचे, काहींनी समाजसेवा करण्याचे, तर काहींनी वर्षभर हटके व वेगळ्या गोष्टी करण्याचे संकल्प साधले आहेत.

छायाचित्रांचा कोलाज
भेटकार्ड आणि भेटवस्तू देण्याचे प्रमाण सध्या कमी झाले असून, सोशल मीडियावरून जगभरात कोठेही संदेश पाठविता येत असल्यामुळे तरुणाईने एकमेकांना एक दिवसाआधीच ‘विश’ करायला सुरवात केली आहे. नवीन फोटो काढून ते आकर्षक सजवून अपलोड केले जात आहेत. या फोटोंना अत्यंत कमी शब्दांत छानसे ‘कॅप्शन’ दिले जात आहेत. तसेच शुभ संदेश असणारे फोटो आणि व्हिडिओ पाठविले जात आहेत. २०१६ मधील आठवणी छायाचित्रांच्या कोलाजमधून फ्रेंड्‌सबरोबर शेअर करण्यात येत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com