शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार

शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार
शहराचा पाणीपुरवठा उद्या बंद राहणार

पुणे - पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर येथील जलकेंद्रांत देखभाल-दुरुस्तीची कामे करायची आहेत. त्यामुळे गुरुवारी (1 डिसेंबर) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेने कळविले आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी (ता. 2) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता असल्याचे महापालिका प्रशासनाने म्हटले आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग पुढीलप्रमाणे : पर्वती जलकेंद्र भाग : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्यनगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, पर्वती दर्शन, मुकुंदनगर, पर्वती गाव, सहकारनगर, सातारा रोड परिसर, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर परिसर, कर्वे रस्ता ते एनएनडीटी परिसर, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड परिसर, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रस्ता, सेमिनरी झोनवरील मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरनगर, साईबाबानगर, सर्व्हे क्र. 42, 46 (कोंढवा खुर्द).
वडगाव जलकेंद्र परिसर : दत्तनगर, हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.
चतुशृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी परिसर, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक परिसर, किष्किंधानगर, रामबाग कॉलनी, डावी- उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलेज परिसर, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ परिसर, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहू कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध, बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड परिसर.

लष्कर जलकेंद्र परिसर : लष्कर भाग, पुणे स्टेशन परिसर, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रस्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, वडगावशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी परिसर.

नवीन होळकर पंपिंग भाग : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, विश्रांतवाडी, विमाननगर परिसर, नगररोड परिसर आदी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com