तुम्हीच सांगा, जगायचं कसं?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

पुणे - स्वतःचा व्यवसाय करून अपंगांना मार्गदर्शन करणाऱ्या ४९ वर्षीय निशाद शाह या दिव्यांग व्यक्‍तीच्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला. एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर शाह यांचे सत्कार समारंभ तर दूरच, साधे कौतुकही कोणी केले नाही.

एकीकडे अशी उपेक्षा, तर दुसरीकडे हक्काचे घर नाही आणि पोलिस, महापालिका कर्मचारी एका जागी व्यवसाय करू देत नाहीत. त्यामुळे ‘तुम्हीच सांगा, आता मी जगायचे तरी कसे,’ असा केविलवाणा प्रश्‍न उपस्थित करण्याची वेळ राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शाह यांच्यावर 
आली आहे.

‘दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार- २०१६’ हा पुरस्कार शाह यांना मागील वर्षी मिळाला. त्यानंतरही शाह कोण आहेत, ते काय करतात आणि त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे प्रश्‍न कोणालाच पडले नाहीत. शुक्रवार पेठेतील एका वाड्यातील छोट्याशा भाड्याच्या खोलीमध्ये शाह हे आपले आई, भाऊ, वहिनी व पुतण्यासमवेत राहत आहेत. विश्रामबाग वाड्याच्या परिसरात फिरून कटलरी, स्टेशनरी व्यवसाय करत होते. एका जागेवर बसून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, तर पोलिस, महापालिकेचे कर्मचारी व्यवसाय करू देत नाहीत. शाह यांची काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्यांच्याकडे आता उपजीविकेचे कुठलेच साधन नाही.

अपंगांना व्यवसायाचे मार्गदर्शन करण्याचे काम शाह आवर्जून करतात. पथारी व्यवसाय करणाऱ्यांच्या संघटनेच्या बैठकांना शाह उपस्थित राहतात. ‘राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते माझा सन्मान झाला; पण पुण्यात कोणी साधा सत्कारही केला नाही,’’ अशी खंत शाह 
व्यक्त करतात.

महापालिका अपंगांना व्यवसाया-साठी गाळे देते. एखादा गाळा मिळाला, तर व्यवसायाचा प्रश्‍न सुटेल. हक्काचे घर नाही. पाच जणांच्या कुटुंबाची ‘दहा बाय दहा’च्या खोलीमध्ये अक्षरशः कुचंबणा होते. व्यवसायासाठी गाळा आणि घर मिळाले तर माझ्या आयुष्यातील सगळे प्रश्‍न सुटतील.
- निशाद शाह, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त दिव्यांग

छोटे- मोठे पुरस्कार मिळविणाऱ्यांनाही समाज मोठ्या प्रमाणात मान- सन्मान देतो. शाह यांनी राष्ट्रपती पुरस्कार मिळवूनही कोणीच त्यांचे कौतुक करत नाही, हे वेदनादायक आहे. विशेषतः कुठल्याही राजकीय पक्ष, सामाजिक- स्वयंसेवी संघटनांनीही शाह यांची दखल घेतली नाही.
- रामदास म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते