पिंपरीच्या महापौरपदी नितीन काळजे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 मार्च 2017

पक्षीय बलाबल 
भाजप     ७७
राष्ट्रवादी काँग्रेस     ३६
शिवसेना    ९
मनसे    १
अपक्ष    ५
एकूण    १२८

पिंपरी - महापालिकेत सर्वाधिक संख्याबळ असलेल्या भाजपच्या नितीन काळजे यांची महापौरपदी तर, शैलजा मोरे यांची उपमहापौरपदी आज (मंगळवार) बिनविरोध निवड झाली.

महापालिका मुख्य इमारतीतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत (विशेष बैठक) ही घोषणा करण्यात आली. भाजपकडून नऊ तारखेला काळजे यांनी महापौरपदासाठी तर, मोरे यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून श्‍याम लांडे यांनी महापौरपदासाठी तर, निकिता कदम यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला होता. पण, या दोघांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.

दरम्यान, आज महापौरपदाच्या निवडीवेळी नितीन काळजे हे बैलगाडीतून महापालिकेत पोहचले होते. काळजे हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या गटातील आहेत.

‘विषय समित्यांची निवड काही दिवसांनंतर 
महापालिका स्थायी समितीच्या १६ जागांवर सदस्य निवडले जाणार आहेत. तसेच, विधी (९), महिला व बालकल्याण (९), शहर सुधारणा (९) आणि क्रीडा-कला-साहित्य व सांस्कृतिक समिती (९) आदी सदस्यांची निवड करण्याचा प्रस्ताव देखील आहे. 

पक्षीय बलाबल 
भाजप     ७७
राष्ट्रवादी काँग्रेस     ३६
शिवसेना    ९
मनसे    १
अपक्ष    ५
एकूण    १२८

Web Title: Nitin Kalje new PCMC Mayor