एटीएममध्ये अजूनही खडखडाट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

पिंपरी - बॅंकेत पुरेशा प्रमाणात रोख रक्‍कम नाही, एटीएममध्येही खडखडाट आहे. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. गुरुवारी औद्योगिक सुटीच्या दिवशी पैसे काढण्यासाठी बॅंकेबाहेर ग्राहकांच्या लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. 

केंद्र सरकारच्या नोटाबंदीनंतर ग्राहकांना आठवड्याला 24 हजार रुपयांपर्यंतची रक्‍कम बॅंकेतून काढण्याची मर्यादा घातली आहे. मात्र, रिझर्व्ह बॅंकेकडून आजही अनेक बॅंकांमध्ये पुरेशी रक्‍कम दिली जात नाही. त्यामुळे ग्राहकांना दोन हजार, चार हजार रुपये काढावे लागत आहेत. 

काही दिवसांपूर्वी बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांच्या नवीन नोटा लवकरच चलनात येणार असल्याचा दावा केला होता. मात्र, अद्याप या नोटा बॅंकांमध्ये उपलब्ध झालेल्या नाहीत. बॅंकेमध्ये पुरेशी रोख रक्‍कम केव्हा येईल, असा प्रश्‍न ग्राहक बॅंकेच्या प्रशासनाला विचारत आहेत. मात्र, बॅंकेच्या अधिकारी समाधानकारक उत्तर देत नसल्याची कैफियत अनेक ग्राहकांनी सकाळकडे मांडली. आपल्याला अपेक्षित रक्‍कम हातात पडेल, या आशेने ग्राहक रांगेत थांबत आहेत. मात्र, बॅंकेच्या तिजोरीतच पुरेशी रोकड नसल्याने ग्राहकांचे हाल होत आहेत. दरम्यान, सध्या निर्माण झालेली परिस्थिती कधी निवळेल, यासंदर्भात एका राष्ट्रीयीकृत बॅंकेचे अधिकारी म्हणाले, नव्या पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आल्या आहेत. त्याचा पुरवठा वाढल्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर येईल. मात्र, त्याला किती वेळ लागेल हे सांगणे तूर्तास कठीण आहे. 

शहरातल्या एटीएममधील तांत्रिक बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे; परंतु या ठिकाणी पुरेशी रोकड उपलब्ध झालेली नाही. अनेक एटीएममध्ये खडखडाट असल्यामुळे ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. शहरातील काही एटीएममध्ये संध्याकाळी रोकड भरली जाते. मात्र, अवघ्या दोन ते तीन तासांमधे ती संपून जाते. शहरातील पिंपरी-चिंचवड, मोरवाडी, बिजलीनगर, वाकड, निगडी, आकुर्डी, भोसरी या परिसरात हीच परिस्थिती असल्याचे पाहायला मिळाले.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): भारत देश हा विविध जाती धर्म व संस्कृतीने जगात आगळावेगळा म्हणून ओळखला जातो. स्व. माजी राष्ट्रपती...

02.30 PM

जुन्नर : शिरोली बुद्रुक ता.जुन्नर येथील प्रसाद थोरवे यांच्या घरात घुसलेल्या सुमारे सहा फूट लांबीच्या नागास जुन्नर येथील सर्प...

02.09 PM

खडकवासला : टेमघरमार्गे लवासाकडे जाणाऱ्या घाटात मंगळवारी एका मिनीबसचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. झाड व कठड्यात बस अडकल्याने...

08.30 AM