दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 जून 2018

भोर - जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दर सोमवारी ‘नो हॉर्न डे’ साजरा करण्यात येणार असून, सोमवारपासून (ता. ४) या उपक्रमास सुरवात करण्यात आली. राज्याचे पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील वाहतूक विभागाकडून याबाबत कार्यवाही करण्यास सुरवात झाली. गर्दीच्या ठिकाणी, रुग्णालये व रहिवासी क्षेत्रात हॉर्नचा वापर कमीत कमी करावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

Web Title: No horn day on every Monday bhor