Silence-Please
Silence-Please

#NoisePollution फक्त कानाने दगा दिला...

पुणे - ‘‘मी कारखान्यात नोकरी करत होतो. जास्त पैसे मिळविण्यासाठी ‘ओव्हरटाइम’ करत होतो. आठच्या ठिकाणी नऊ-दहा तास राबायचो. अजस्र यंत्रांचा आवाज कानांवर आदळत असायचा. पण कानांत कापसाचे बोळे घालून काम करायचो. तरीही त्या आवाजामुळे आता कायमचा बहिरेपणा आला आहे.

ऐकायलाच येत नसल्याने कंपनीतून स्वेच्छा निवृत्ती घ्यावी लागली. आता मिळेल ते काम करत आहे,’’ बाळासाहेब कदरे बोलत होते. ‘‘फक्त कानाने दगा दिला आणि आयुष्यच बदलले,’’ या वाक्‍यानंतर त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

‘‘कंपनीत महिन्याला २७ हजार रुपये मिळायचे. वयाच्या ४८ वर्षांपर्यंत नोकरी केली. आता पन्नाशीत असताना कामासाठी धडपड करावी लागते. मिळेत ते काम करावे लागते. कधी सुरक्षारक्षक, तर कधी बांधकामाच्या साइटवर असतो. हे फक्त बहिरेपणामुळे झाले,’’ ससून रुग्णालयात उपचारांसाठी आलेले कदरे सांगत होते. 

ध्वनिप्रदूषण मग ते कुठलेही असो ते धोक्‍याचेच आहे. हेच कदरे यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. पुण्यात औद्योगिक, व्यावसायिक, निवासी या क्षेत्रांतील ध्वनिप्रदूषण धोक्‍याच्या पातळीवर आहेच, पण शांतता क्षेत्र असलेली शाळा, महाविद्यालये, न्यायालये, रुग्णालये देखील शांत नाहीत, हे विशेष !

औद्योगिक क्षेत्र
या क्षेत्रात दिवसा ७५ आणि रात्री ७० डेसिबलपर्यंत आवाजाची मर्यादा आहे. सर्वेक्षणात ६ ठिकाणी ध्वनिप्रदूषणाच्या पातळीने मोठी होती. हडपसर औद्योगिक क्षेत्र, तुकाईनगर जलशुद्धीकरण प्रकल्प यात आहेत.

निवासी क्षेत्र
शहरातील निवासी क्षेत्र ध्वनिप्रदूषणापासून सुरक्षित नसल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसिबल इतकी आवाजाची मर्यादा कायद्याने घालून दिलेली आहे. या क्षेत्रातही आजावाची मर्यादा पाळली जात नाही.

व्यावसायिक क्षेत्र
दिवसभर माणसांची वर्दळ, वाहनांचे आवाज, कर्णकर्कश हॉर्न यामुळे व्यावसायिक क्षेत्र असलेल्या तुळशीबागेत रात्रंदिवस ध्वनिप्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष ‘निरी’ने सर्वेक्षणातून काढला आहे. 

शांतता क्षेत्र
रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, न्यायालये येथे दिवसा ५० आणि रात्री ४० पेक्षा जास्त डेसिबलसचा आवाज नसावा, असे कायद्याने सांगितले आहे. प्रत्यक्षात पुण्यातील कोणत्याच शाळा, महाविद्यालय परिसरात शांतता आढळली नाही. 

माणूस आठ तास ९० डेसिबलच्या आत आवाज सहन करू शकतो. त्यानंतर मोठा आवाज आदळत राहिल्यास परिणाम होतो. औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी श्रवणशक्ती कमी झाल्यास उपचार करावेत. सुरवातीला बहिरेपणा तात्पुरता असतो. उपचार न केल्यास कायम बहिरे होण्याचा धोका असतो.
- डॉ. समीर जोशी, कान, नाक, घसा विभाग प्रमुख, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com