नावांबाबत ९०९ हरकती, सूचना

नावांबाबत ९०९ हरकती, सूचना

अंतिम मतदार यादी २१ जानेवारीला जाहीर होणार; २६ लाख मतदारांची नोंदणी पूर्ण

पुणे - प्रारूप मतदार यादीतील नावांबाबत शहरातील ४१ प्रभागांतून ९०९ हरकती आणि सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. येत्या तीन दिवसांत या हरकती-सूचनांची सुनावणी होऊन मतदारांची अंतिम यादी २१ जानेवारीला जाहीर होणार आहे. दरम्यान,  सुमारे २६ लाख ४६ हजार मतदारांची नोंदणी पूर्ण करण्यात आली आहे.

पहिली मतदार यादी २१ डिसेंबर रोजी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सुमारे दीडशे हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. मात्र, त्यानंतर प्रभागातील मतदारांच्या संख्येनुसार महापालिकेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ती प्रसिद्ध केली. त्यावर १२ ते १७ जानेवारी दरम्यान हरकती-सूचना मागवण्यात आल्या. मूळ यादीमध्ये २४ लाख ८८ हजार मतदारांची नोंद होती. त्यानंतर पुरवणी यादीमध्ये नवमतदार आणि अन्य मतदार अशा एक लाख ५८ हजार मतदारांचा यादीमध्ये नव्याने समावेश करण्यात आला आहे.  

सर्वाधिक हरकती धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक ३८, ३९, ४० मधून आल्या आहेत, तर सर्वांत कमी हरकती या येरवडा क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग एक, दोन आणि सहामधून आल्या आहेत. त्यांची सुनावणी क्षेत्रीय कार्यालयस्तरावर होणार असून, त्यासाठी महापालिकेने नियुक्त केलेले प्रगणक क्षेत्रीय अधिकाऱ्यांना मदत करणार आहेत.

आचारसंहिता आणि खर्चाचे हिशेब तपासणी कक्षप्रमुख म्हणून महापालिकेतील करआकारणी-करसंकलन प्रमुख आणि उपायुक्त सुहास मापारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी पुढीलप्रमाणे 
१) अशोक पाटील (उपजिल्हाधिकारी, कोल्हापूर) - प्रभाग क्रमांक ८, ९ औंध क्षेत्रीय कार्यालय 
२) विजया पांगारकर (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे) ७, १४, १६ घोलेरस्ता क्षेत्रीय कार्यालय 
३) धनाजी पाटील (उपजिल्हाधिकारी, सातारा) १०, ११, १२ कोथरूड क्षेत्रीय कार्यालय 
४) नंदिनी आवाडे (भाडे नियंत्रण न्यायाधिकरण, पुणे) १३, ३१, ३२ वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय 
५) अजित देशमुख (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) १, २, ६ येरवडा क्षेत्रीय कार्यालय 
६) प्रशांत पाटील (पिंपरी चिंचवड. विकास प्राधिकरण) ३, ४, ५ नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालय 
७) संजय पाटील (उपजिल्हाधिकारी, रोहयो, सातारा) १८, १९, २० भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय 
८) आरती भोसले (जिल्हा पुनर्वसन अधिकारी, सातारा) १५, १७, २९ कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालय 
९) वर्षा लांडगे (उपजिल्हाधिकारी, पुणे) ३०, ३३, ३४ टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय 
१०) हर्षलता गेडाम (विशेष भूसंपादन अधिकारी) २८, ३५, ३६ सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय 
११) राणी ताटे (पिं-चिं नवनगर प्राधिकरण) २७, ३७, ४१ बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय 
१२) मोनिका सिंह ठाकूर (रजा राखीव उपजिल्हाधिकारी) ३८, ३९, ४० धनकवडी क्षेत्रीय कार्यालय 
१३) सुभाष बोरकर (उपजिल्हाधिकारी, जमाबंदी, पुणे) २१, २२, २३ हडपसर क्षेत्रीय कार्यालय 
१४) ज्योती कदम-लाटे (उपविभागीय अधिकारी, हवेली) २४, २५, २६ कोंढवा-वानवडी क्षेत्रीय कार्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com