जुने भुयारी मार्ग वापराविना पडून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

शहरात जुने असलेले भुयारी मार्ग वापराविना पडून आहेत. कारण या भुयारी मार्गांची रचना पादचाऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून करण्यात आलेली नव्हती. वाहनांना रस्त्याच्या पातळीवरून, तर पादचाऱ्यांना किमान पन्नास पायऱ्या उतरून व चढून जावे लागत असल्यामुळे अनेक भुयारी मार्ग निरुपयोगी ठरले होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून भुयारी मार्गांची रचना पादचारी-केंद्रित करण्यात आली. पादचाऱ्यांना रस्त्याच्या समपातळीवर ठेवून वाहनांसाठी छोट्याशा पुलाप्रमाणे उंचवट्यावरून नेण्याची ही रचना यशस्वी ठरली. त्याची काही उदाहरणे.

मेहेंदळे गॅरेज चौक 
निरीक्षण 

मेहेंदळे गॅरेज चौक वर्दळीचा असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह, महिला, विद्यार्थ्यांची भुयारी मार्गातून मोठ्या प्रमाणात ये-जा असते. गुळवणी पथ, नळस्टॉप व म्हात्रे पुलाकडे जाणारे नागरिक या मार्गाचा वापर करतात. या मार्गात देव-देवतांच्या प्रतिकृती, निसर्गचित्र आखीव रेखीव चित्रांच्या फ्रेम काचेमध्ये लावण्यात आलेल्या आहेत. भुयारी मार्ग खोल असून पावसाळ्यात पाणी साचू नये म्हणून आठ ठिकाणी नाल्यावरती जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. भुयारी मार्गात साफ-सफाई असल्याचे दिसून आले.  
 प्रकाशव्यवस्था उत्तम   सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भुयारी मार्ग सुरू, या वेळेत सुरक्षारक्षकांची नेमणूक 
 नियम पाळण्याबाबत ठिकठिकाणी सूचना फलक

भुयारी मार्गातून रोज प्रवास करत असून, कधीही भीतीदायक वातावरण जाणवले नाही. मेहेंदळे गॅरेज चौक मोठा असल्याने रस्ता ओलांडताना अपघात होण्याची शक्‍यता आहे. यामुळे या परिसरातील बहुतेक नागरिक भुयारी मार्गाचा वापर करतात. 
 - नागेश नाईक, विद्यार्थी

दुगड चौक : (सातारा रस्ता)
पादचाऱ्यांसाठी असलेल्या भुयारी मार्गातून बिबवेवाडीकडून स्वारगेटकडे जाणाऱ्या दुचाकी वाहनांसाठीही वेगळा मार्ग तयार करण्यात आला आहे. असे असले तरी भुयारी मार्गांच्या आतील भागात पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात आली आहे. भुयारी मार्गात वाहनांचा वेग मर्यादित राहण्यासाठी गतीरोधक बसविण्यात आलेले आहेत. पदपथाला सुरक्षा जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. 

 भुयारी मार्गाचा वापर करणाऱ्यांची संख्या जास्त 
 भुयारी मार्गातील अंतर्गत स्वच्छतेकडे दुर्लक्ष, कचऱ्याचे ढीग, विद्युत दिव्यांची मोडतोड