Dnyaneshwar Jagtap
Dnyaneshwar JagtapSakal

ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकलच्या अपघातात एकजण जागीच मृत्युमुखी

बारामती-नीरा राज्यमार्गावर आज हनुमाननगर-सातववस्ती टोल नाका नजिक ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकलचा झालेल्या अपघातात एकजण जागीच मृत्युमुखी पडला.
Summary

बारामती-नीरा राज्यमार्गावर आज हनुमाननगर-सातववस्ती टोल नाका नजिक ट्रॅक्टर ट्रॉली आणि मोटारसायकलचा झालेल्या अपघातात एकजण जागीच मृत्युमुखी पडला.

माळेगाव - बारामती-नीरा राज्यमार्गावर आज हनुमाननगर-सातववस्ती टोल नाका नजिक ट्रॅक्टर ट्रॉली (Tractor Trolley) आणि मोटारसायकलचा (Motorcycle) झालेल्या अपघातात (Accident) एकजण जागीच मृत्युमुखी (Death) पडला. ज्ञानेश्वर उर्फ माऊली अप्पासाहेब जगताप (वय ५४ रा. पणदरे, ता. बारामती) असे मोटारसायकलस्वार मयताचे नाव आहे. वरील मयत व्यक्ती ही इलेक्ट्रीकलची कामे करीत होते. मंगळवारी दुपारच्यावेळी वरील दुर्घटना घडली. विशेषतः ही दुर्घटना एवढी भयंकर होती, की सदर जखमी जागीच मयत झाल्याने स्थानिकांसह इतर प्रवाशांना त्यांना पुढील वैद्यकिय उपचारास नेहण्यासाठी पुरेसा वेळच मिळाला नाही.

दरम्यानच्या कालावधीत माळेगाव कारखान्याचे संचालक योगेश जगताप आदी कार्यकर्त्यांनी सदर अपघातग्रस्त स्थिती विचारात घेत तातडीने घटनास्थळी धाव घेतली व मदत कार्य़ हाती घेतले. संबंधित मयताचा मुलगा नोकरीनिमित्ताने पंजाब असल्याची माहिती जगताप यांनी दिली. दरम्यान, बारामती-नीरा राज्यमार्गाने ट्रॅक्टर-ट्रॅाली कुंभारी विटा घेवून माळेगावच्या दिशेने निघाला होती, तर मयत मोटारसायकस्वार बारामतीच्या दिशेने निघाले असता हनुमाननगर येथे संबंधित वाहनांची समोरासमोर धडक झाली. सदरचा राज्यमार्ग अरुंद आणि वाहतूक प्रचंड झाल्याने या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने मंजूर रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रवाशांसह स्थानिकांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com