अज्ञात वाहनाच्या धडकेत अनोळखी ठार

संदीप घिसे 
सोमवार, 9 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्ती ठार झाली आहे. ही घटना मोशी येथे सोमवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती मोशी ते देहू या रस्त्यावर श्री हॉस्पिटल जवळ जखमी अवस्थेत पडली असल्याची माहिती नियंत्रण कक्षाकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत व्यक्तीचे वय अंदाजे २८ वर्षे आहे. त्याच्याजवळ ओळख पटली असे कोणतेही कागदपत्र आढळून आले नाहीत.

Web Title: one killed in accident