वाकडमध्ये तरुणाची आत्महत्या 

suicide
suicide

पिंपरी (पुणे) -  विषारी औषध प्राशन करून एका तरुणाने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. ही घटना सोमवारी (ता.२५) सकाळी वाकड येथे उघडकीस आली.

अविनाश संभाजी पवार (वय ३५ रा. बेलठिकानगर, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक हरिष माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील शिवकॉलनी समोर एकजण बेशुद्ध अवस्थेत पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या व्यक्तीस त्वरित रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. मयत व्यक्तीकडे सापडलेल्या कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली आहे. कौटुंबिक कारणातून आपण आत्महत्या करीत असल्याचे अविनाश यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com