उंडवडी कडेपठार येथे ऑनलाइन जमिनीचा सातबारा उतारा दुरुस्ती मोहीम

satbara
satbara

उंडवडी (पुणे) : ऑनलाइन- संगणकीकृत जमिनीच्या सातबारा उताऱ्यामध्ये आढळून आलेल्या चुका, दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना तहसील कचेरीत हेलपाटे मारायाला लागून वेळ, पैसा व श्रम वाया जावू नये, यासाठी बारामती महसूल विभागाने सात- बारा दुरुस्तीसाठी मंडल निहाय शेतकऱ्यांच्या सुनावण्या घेवून तातडीने 7/12 दुरुस्ती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत नुकतेच उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथे तहसीलदार हनुमंत पाटील यांनी या मंडलातील 16 गावातील 350 प्रकरणापैकी महाराष्ट्र महसूल कलम 155 अधिनियमाखाली सुनावनी घेवून 70 ते 80 प्रकरणे निकाली काढून 7/12 दुरुस्ती करण्याचे आदेश गावकामगार तलाठ्यांना दिले. 

यावेळी मंडल अधिकारी एम. पी. सय्यद, सरपंच विशाल कोकरे, उपसरपंच बाळासाहेब जराड, ग्रामपंचायतीचे सदस्य भुषण जराड, गणेश कुचेकर, स्वप्निल जराड, सुरज गोसावी, जयराज बागल, नवनाथ बागल, समीर बनकर व संबधीत गावातील गावकामगार तलाठी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या डिजिटल स्वाक्षरीचा संगणीकृत 7/12 लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. यासाठी महसूल विभागाकडून मोठे प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये ऑनलाइन संगणीकृत जमिनीच्या 7/12 मध्ये आढळून आलेल्या चुका तातडीने दुरुस्ती व्हाव्यात, व शेतकऱ्यांना 7/12 उतारा दुरुस्तीसाठी तहसील कचेरीत हेलपाटे मारून वेळ आणि पैसा जावू नये, यासाठी तहसीलदार हनुमंत पाटील यांनी मंडलनिहाय सुनावणी घेवून तातडीने 7/12 दुरुस्तीची मोहीम हाती घेतली आहे. 

हा उपक्रम उंडवडी कडेपठार येथे नुकताच घेण्यात आला. यामध्ये उंडवडी कडेपठार, जराडवाडी, सोनवडी सुपे, बऱ्हाणपूर, नेपतवळण, मेडद, शिर्सुफळ, साबळेवाडी, गाडीखेल, पारवडी, निंबोडी, तांदूळवाडी, जैनकवाडी, कटफळ, गोजुबावी, सावंतवाडी या 16 गावातील 80 शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र महसूल कलम 155 अधिनियमाखाली सुनावनी घेवून सुनावण्या घेतल्या व कागदपत्राची पडताळणी करून 70 ते 80 प्रकरणे निकाली काढून 7/12 दुरुस्ती करण्याचे गावकामगार तलाठ्यांना आदेश दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, पैसा व श्रम वाचले. तसेच या उपक्रमामुळे महसूल संदर्भातील इतरही प्रश्न मार्गी लागण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून  समाधान व्यक्त होत आहे. 

याबाबत तहसीलदार हनुमंत पाटील म्हणाले, ''बारामती तालुक्यात एकूण 78 हजार 7/12 आहेत. यामध्ये जवळपास दोन ते अडीच हजार 7/12 दुरुस्त्या होत्या. त्यापैकी पहिल्या टप्यात तालुक्यातील आठ मंडलात किमान 800 दुरुस्त्या झाल्या आहेत. उर्वरीत तीन टप्यात जवळपास सर्व काम पूर्ण होईल. असा आमचा प्रयत्न आहे.''   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com