ऑनलाइन शॉपिंगवर सवलतींचा वर्षाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे : "लाल रंगांचा तो टी-शर्ट किती छान आहे', "ख्रिसमसला सांताक्‍लॉजचा ड्रेस ऑर्डर करायचा का?' आणि हो, "मी ख्रिसमससाठी लाल रंगाचा टॉप घेतला आहे'... ही ऑनलाइन चर्चा आहे ख्रिसमस शॉपिंगची. 20 ते 50 टक्‍क्‍यांची सवलत, जोडीला आवडता ड्रेसकोड आणि त्याला मॅचिंग ऍक्‍सेसरीजचा स्टायलिश लूक. ख्रिसमससाठी विविध संकेतस्थळ आणि ऍपवर सवलतींचा वर्षाव होताना दिसतोय. हटके व वेगळ्या लूकसाठी "ऑनलाइन खरेदी'चा ट्रेंड तरुणाईमध्ये लोकप्रिय होत आहे.

आवडीचे रंग, प्रकार आणि किमतीत मिळणारी भरघोस सूट, या वैशिष्ट्यांमुळे ऑनलाइन शॉपिंगला सर्वच घटकांची पसंती मिळत आहे. यामुळे वेळ, पैशांची बचत होण्याबरोबरच मानसिक त्रासही कमी होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुकाने किंवा मॉलमध्ये मोठी सवलत मिळतेच असे नाही; मात्र ख्रिसमसनिमित्त वेगवेगळ्या संकेतस्थळांवर मोठ्या प्रमाणात सवलती मिळत आहेत.
ऑनलाइन शॉपिंग ट्रेंडनुसार कपडे आणि ऍक्‍सेसरीजची खरेदी वाढली आहे. कॅमेरे, घड्याळे, ड्रायफ्रूट, चॉकलेट बॉक्‍स आदी वस्तूंची खरेदी करण्याला प्राधान्य मिळत आहे. संकेतस्थळांबरोबरच ई-मेल, फेसबुक, यूट्युब, ट्‌विटर, इलेक्‍ट्रॉनिक व मुद्रित माध्यमांच्या ई-आवृत्त्यांवरही जाहिराती मोठ्या प्रमाणात झळकत आहेत.

'ऑनलाइन'ची वैशिष्ट्ये...
- 50 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंतची घसघशीत सूट
- पेट्रोल, पार्किंग खर्चाची बचत
- वस्तूंची तुलना करणे शक्‍य
- खरेदीसाठी वेळेचे बंधन नाही
- प्रतिक्रिया देण्याची व्यवस्था
- पैसे देण्यासाठीही अनेक पर्याय

किती प्रमाणात वस्तू पाहिजेत, याचा आम्हाला ऑनलाइन शॉपिंग कंपनीचा मेल येतो. मागणीनुसार वस्तूला त्या कंपनीच्या नावाचे पॅकिंग करून वस्तू दिली जाते. ग्राहकांनी वस्तू खरेदी केल्यास ती काही दिवसांतच उत्कृष्ट पॅकिंगमध्ये घरपोच दिली जाते. थेट कंपनीकडून वस्तू घेतल्याने त्यावरील अन्य खर्च टळतो. त्यामुळे ऑनलाइन शॉपिंगवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जाते.
- रोहन जगदाळे, ऑनलाइन शॉपिंग व्यावसायिक

Web Title: online shopping showers offers