‘उजनी’चे १६ दरवाजे उघडले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 ऑक्टोबर 2016

इंदापूर - उजनी धरण परिसर, तसेच धरणाच्या पुणे जिल्ह्यातील पाणलोट क्षेत्रातील धरणांमधून येणारे पाणी यामुळे ‘उजनी’त सोमवारी (ता. ३) दुपारी चार वाजता १२१.६२ टीएमसी पाणीसाठा झाला. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे १६ दरवाजे १८ सेंटिमीटर उचलून ९ हजार क्‍युसेक पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे.

क्षमतेपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यामुळे धरणास धोका पोचू नये तसेच विशिष्ट पाणी पातळी स्थिर राहावी म्हणून सोमवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्‍युसेक पाणी ८ दरवाज्यांतून तर पुन्हा पाणीपातळी वाढू लागल्यामुळे दुपारपासून १६ दरवाजे १८ सेंटिमीटर उघडून नऊ हजार क्‍युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यास सुरवात झाली, अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापनाचे शाखा अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर यांनी दिली.

क्षीरसागर म्हणाले, ‘‘ता. ३० सप्टेंबर रोजी उजनी धरण शंभर टक्के भरले. धरणात तत्पूर्वी ९७ टक्के पाणीसाठा झाला, तेव्हाच पुणे, नगर, सोलापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा दिला होता. धरणातून भीमा व नीरा नदीत पाणी सोडण्याबाबत पुणे, सोलापूर व नगर जिल्ह्यातील महसूल व पोलिस खात्यास सूचना देण्यात आल्या. सध्या धरणाची पाणीपातळी ४९७.१९५ मीटर झाली असून धरणातील एकूण पाणीसाठा १२१.६२ टीएमसी आहे. 

धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५७.९६ टीएमसी झाला असून दौंड येथून भीमा नदीत १७,८२० क्‍युसेक पाण्याचा विसर्ग धरणात येत आहे. त्यामुळे सध्या धरण कालव्यातून २०००, तर वीजनिर्मितीसाठी १५५० क्‍युसेक पाणी वापरण्यात येत आहे. 

Web Title: Opened its doors 16 ujanice