रयत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी अद्यायावत ग्रंथालयाचे उदघाटन

संदीप जगदाळे
मंगळवार, 3 एप्रिल 2018

हडपसर - रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविदयालयामध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी अद्यायावत ग्रंथालयाचे उदघाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना, सर्वसामान्य समाजातील व ग्रामीण भागातल्या गरीब कष्टकरी बहुजन वर्गाला विकासाच्या, समृद्धीच्या वाटेवर आणायचे असेल तर त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या प्रसाराबरोबर वाचनाची क्षमता विकसित करावी लागेल. कारण वाचनातून बौद्धिक व विचार क्षमता दृढ होऊन वैचारिक बैठक निर्माण होते. माणसाचे परिवर्तन व विकास त्याच्या विचारावर अवलंबून असतो.

हडपसर - रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी महाविदयालयामध्ये विद्यार्थ्यांना वाचनासाठी अद्यायावत ग्रंथालयाचे उदघाटन डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना, सर्वसामान्य समाजातील व ग्रामीण भागातल्या गरीब कष्टकरी बहुजन वर्गाला विकासाच्या, समृद्धीच्या वाटेवर आणायचे असेल तर त्यांच्यामध्ये शिक्षणाच्या प्रसाराबरोबर वाचनाची क्षमता विकसित करावी लागेल. कारण वाचनातून बौद्धिक व विचार क्षमता दृढ होऊन वैचारिक बैठक निर्माण होते. माणसाचे परिवर्तन व विकास त्याच्या विचारावर अवलंबून असतो. त्यामुळे आजच्या नव्या पिढीला घडविण्या.साठी व विचारांची चळवळ पुढे नेण्यासाठी अद्यावत व सुसज्ज ग्रंथालय असणे काळाची गरज आहे. आजही मोठ्या प्रमाणात वाचक वर्ग आहे. फक्त वाचनाची माध्यमे बदलली आहेत. त्याचा शोध घेऊन आधुनिक ग्रंथालये निर्माण व्हावीत अशी अपेक्षा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांनी व्यक्त केली.

याप्रसंगी स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य अशोक तुपे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य दिलीप तुपे, रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्रिं. डॉ. भाऊसाहेब कराळे, डॉ. गोविंद उमरजी, प्राचार्य, डॉ. अरविंद बुरुंगले, प्राचार्य. डॉ. अशोक भोईटे, उपप्राचार्य. डॉ. अशोक धुमाळ, प्रा. सुप्रिया नवले, डॅा. अशोक धामणे, डॉ. शकुंतला सावंत, डॉ. एम. एल. डोंगरे, डॉ. प्रभंजन चव्हाण, अधीक्षक आर. आर. जाधव, डॉ. डी. जी. हिंगणे उपस्थित होते. 

Web Title: Opening of new Library for students of Rayat Shikshan Sanstha