"आपलं घर महिला हाउसिंग डे योजने'ला पुणेकरांचा प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मार्च 2017

पुणे - जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ पुण्यातील "आपलं घर'ने "आपलं घर महिला हाउसिंग डे' योजना सादर केली. याला सर्व स्तरातील पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत त्यांच्या हक्काचं घर बुक केलं. आता महिलांच्या आग्रहास्तव योजनेची मुदत 19 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

या योजनेमध्ये पुण्याच्या चारही दिशांना असणाऱ्या 18 ठिकाणांवर सर्वांना 7.5 लाखांपासूनचे घर बुक करता येईल आणि 7.5 लाखांपर्यंतचा फायदासुद्धा मिळवता येईल. अर्थात पुरुषांना घरातील महिलेच्या नावावर घर बुक करणे बंधनकारक असणार आहे. ज्यांना सॅम्पल फ्लॅट बघायचा आहे, त्यांच्यासाठी शिवाजीनगर येथील मेपल ऑफिसमध्ये सोय करण्यात आली आहे. तसेच साइट व्हिजिटची सुविधाही उपलब्ध आहे. मेपल शेल्टर्स डॉट कॉम या संकेतस्थळावर योजनेची अधिक माहिती मिळेल आणि घरसुद्धा बुक करता येईल. 

""बऱ्याच महिलांनी आणि व्यक्तींनी मुलांच्या परीक्षांमुळे आणि इतर काही कारणांमुळे आम्हाला घर पाहता आले नाही, असे सांगितले आहे. तसेच नाशिक, कोल्हापूर, सांगली, मुंबई, अहमदनगर येथील अनेकांना या योजनेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे त्यांच्या आणि पुणेकर महिलांच्या विनंतीनुसार ही योजना 19 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर 20 मार्चपासून 7.5 लाखांऐवजी फक्त 2.5 लाखांपर्यंतचाच फायदा मिळेल. तसेच आता "आपलं घर'मध्ये थोडेच फ्लॅट्‌स शिल्लक आहेत, तेव्हा लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यावा,'' असे आवाहन मेपल ग्रुपचे संचालक सचिन अगरवाल यांनी केले.