आपली सावली आज गायब होणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 मे 2017

पुणे - आपल्याच सावलीने आपली साथ सोडली तर? सावली कधी दिसेनाशी झाली तर? असे कधी घडेल का? होय, आपली सावली चक्क आपल्या पायाखाली पडेल, तेही उद्या (शनिवार), म्हणजेच १३ मे रोजी. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून ३१ मिनिटांनी आपली सावली दिसेनाशी होईल. 

दरवर्षी वर्षातून दोनदा आपली सावली गायब होते. त्या दिवसाला ‘झिरो शॅडो डे’ असे म्हणतात. या निमित्ताने ज्योतिर्विद्या परिसंस्थेतर्फे टिळक स्मारक मंदिर येथे दुर्बिणीतून सौरडागांचे निरीक्षण करण्याची संधी उपलब्ध केली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असल्याचे संस्थेचे सचिव डॉ. सागर गोखले यांनी कळविले आहे.

टॅग्स