चाकणमध्ये 125 सापांसह दोघे ताब्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

पुणे- चाकण येथील दोघांनी एका सदनिकेत तब्बल सव्वाशे विषारी साप ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या सापांचे दुर्मिळ असे 25 ग्रॅम विषासह दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी त्यांनी जिथे साप ठेवले होते त्या घरातच राहत होते. रणजीत पंढरीनाथ खर्गे (वय 37) असे अटक करण्यात आलेल्यांपैकी एकाचे नाव असून, चाकण येथील खराबवाडी परिसरातील सारा सिटी येथील ए-1 या सदनिकेत तो राहत होता. 

आरोपींनी ठेवलेल्या सापांमध्ये 45 घोणस, 70 नागांचा समावेश आहे. शंभरहून अधिक साप असलेल्या फ्लॅटमध्ये ते दोघे राहत होते. या सापांच्या 25 ग्रॅम विषासह दोनजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस याप्रकरणी पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स
फोटो गॅलरी