जाणून घ्या, पॅक हाउस, कोल्ड स्टोअरेज तंत्रज्ञान

जाणून घ्या, पॅक हाउस, कोल्ड स्टोअरेज तंत्रज्ञान

पुणे - शेतमाल काढणीपश्‍चात (पोस्ट हार्वेस्ट) व्यवस्थापनातील महत्त्वाचा भाग असलेल्या फायदेशीर पॅक हाउस व कोल्ड स्टोअरेज तंत्रज्ञान उभारणीविषयी इत्थंभूत मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय प्रशिक्षण ता. २० आणि २१ मे रोजी आयोजित केले आहे. शेतमालाचे क्‍लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग करण्यासाठी शेतकरी स्वतः त्यांच्या शेतावर पॅकहाउस आणि मालाची साठवण करण्यासाठी कोल्ड स्टोअरेज बांधू शकतात. मार्केट चांगले असेल त्या वेळी माल विक्रीस काढून योग्य दर मिळविणे शक्‍य होते, त्यामुळे या तंत्रज्ञानाला सरकारही प्रोत्साहन देत आहे.

या प्रशिक्षणात पॅक हाउस, कोल्ड स्टोरेजची उभारणी, अर्थशास्त्र, अपेक्षित गुंतवणूक, उभारणीसाठी आवश्‍यक साधनसामग्री, प्रोजेक्‍ट रिपोर्ट, बॅंक फायनान्स, अपेडाची मंजुरी, सरकारी अनुदान आदींविषयी मार्गदर्शन होईल. तसेच, कोल्ड स्टोअरेज व पॅक हाउसला शिवारफेरीचे आयोजन केले आहे. प्रतिव्यक्ती तीन हजार रुपये शुल्क असून, आगाऊ नावनोंदणी करणे आवश्‍यक आहे. संपर्क - ८६०५६९९००७

‘मल्टिपल इंटिलिजन्सद्वारे बना चाइल्ड काउन्सिलर’

हार्वर्ड विद्यापीठाने तयार केलेला ‘मल्टिपल इंटलिजन्स अँड काउन्सिलिंग’ हा चार दिवसीय वीकएन्ड सर्टिफिकेट कोर्स ता. १३- १४ आणि २०- २१ मे रोजी आयोजित केला असून, ही आठवी बॅच आहे. 

विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता शोधून त्यांच्यातील क्षमता विकसित केल्यास ते यश मिळवतात, हे सिद्ध झाल्यानंतर मल्टिपल इंटलिजन्स चाचण्यांचा वापर पहिलीपासून पीएच.डी.पर्यंत केला जात आहे. या कोर्समध्ये ४ ते ६० वयोगटातील व्यक्तींचे काउन्सिलिंग कसे करावे, याचे प्रात्यक्षिक घेतले जाईल. प्रशिक्षणार्थींना हार्वर्ड विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. ब्रॅन्टन यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देखील मिळेल. यातून नोंदणीकृत काउन्सिलर
 म्हणून व्यवसायाची व निवडक विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळू शकते. प्रतिव्यक्ती अकरा हजार रुपये शुल्क आहे.
संपर्क - ८८८८८३९०८२

मिळवा ‘मूलभूत सिनेमॅटोग्राफी’चे तंत्र

मूलभूत सिनेमॅटोग्राफी विषयावरील दोन दिवसीय प्रशिक्षण ता. १३ मे रोजी सुरू होत आहे. यात कॅमेऱ्याच्या मूलभूत संज्ञा ॲपर्चर, लेन्सेस, शटर स्पीड, एक्‍स्पोजर आदींपासून चित्रफीतनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक व्हिडिओ कॅमेऱ्याच्या विविध तांत्रिक बाबींची प्राथमिक माहिती दिली जाणार आहे. 

कॅमेऱ्यावरील विविध कळफलके, लेन्सेस आदींचा सुयोग्य वापर करून शूटिंग कसे करावे, कॅमेऱ्याचे विविध अँगल्स कसे लावावेत, प्रकाशयोजना आणि त्याचे नियोजन आदींसंदर्भात प्रसिद्ध ‘सिनेमॅटोग्राफर’ विवेक आपटे मार्गदर्शन करणार आहेत. कॅमेरे प्रत्यक्ष हाताळायला देखील मिळेल. छोट्या- मोठ्या समारंभांपासून अगदी लघुचित्रपटाच्या चित्रीकरणापर्यंतचे मूलभूत ज्ञान यात मिळेल. प्रतिव्यक्ती चार हजार रुपये शुल्क आहे.
संपर्क : ७७२२०११३२९

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com