कागदी पिशव्या प्रशिक्षण शिबिर संपन्न

paper-bags
paper-bags

हडपसर - राज्यात प्लास्टिक बंदीला निर्णय लागू झाल्यावर पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांना प्रचंड मागणी वाढली आहे. प्लास्टिक बंदीसाठी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने व्यावसायिक तसेच दुकानदार यांच्याकडून देखील कागदी पिशव्यांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. ग्राहकांमध्ये देखील या संदर्भात मोठया प्रमाणात जागृती होण्यास सुरवात झाली आहे. 

प्लास्टिक बंदीमुळे कागदी पिशव्यांच्या उत्पादन आणि विक्री क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणावर व्यावसायिक संधी निर्माण झाली आहे. हा नवीन लघु उद्योग कमी भांडवलातदेखील सुरू करा येतो. या व्यावसायिक संधीचा लाभ महिला, बचत गट तसेच बेरोजरगार यांना मिळवून देण्याचे आणि त्यांना यशस्वी उद्योजक बनविण्याचे आव्हान महाबॅंक आरसेटी, हडपसर या संस्थेने स्वीकारले आहे. 

या पार्श्वभूमीवर आरसेटी तर्फे दहा दिवसाचे पेपर बॅग, पाईल, एन्वलोप बनविणे या व्यावसायवर आधारीत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रशिक्षणाचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र बॅंके तर्फे करण्यात आला. या प्रशिक्षणाचे उदघाटन बॅक ऑफ महाराष्ट्र जिल्हा व्यवसाथपक आनंद बेडेकर यांच्या हस्ते झाले. 

प्रशिक्षणामध्ये पुणे जिल्हयातील ३५ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेतला. यामध्ये २५ महिलांचा सहभाग होता. या प्रशिक्षणात १० प्रकारच्या कागदी पिशव्या, ३ प्रकारच्या फाईल्स व एन्वहलोप बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याशिवाय व्यावसायासाठी लागणारी यंत्रसामुग्री, कच्च्या मालाची खरेदी, व्यवसायाचे व्यवस्थापन, मार्केटिंग, अर्थशास्त्र, प्रकल्प अवहाल बनविणे, मुद्रा योजना, स्टॅंअप इंडीया, प्रधानमंत्री रोजगार निर्मीती योजना सारख्या कर्ज व अनुदान योजना आदी बांबीवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. 

समारोप प्रसंगी बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सहाय्यक महाव्यवस्थापक पी. पी. जाधव, रावसाहेब पवार साखर कारखान्याचे चेअरमन अशोक पवार, नगरसेविका हेमलता मगर, बार्टीच्या प्रकल्प संचालिका आरती डोळस, समन्वयक सतीश कळमकर, आरसेटीचे संचालक गौरव देशपांडे, वैजनाथ कुलकर्णी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com