पर्वती निवडणुकीतील 'ती' ईव्हीएम मशिन तपासणीसाठी रवाना

यशपाल सोनकांबळे
शुक्रवार, 12 मे 2017

हैदराबाद फोरेन्सिक लॅबला रवाना, जिल्हा प्रशासनाची कार्यवाही

पुणे: उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पर्वती विधानसभा मतदारसंघातील 'ती' संशयित ईव्हीएम मशिन शुक्रवारी हैदराबाद फोरेन्सिक लॅबला रवाना करण्यात आली.

यावेळी निवडणुक शाखेच्या प्रमुख समिक्षा चंद्राकार, हवेलीच्या उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष ऍड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम मशिनमध्ये छेडछाड करण्यात आल्याचा आरोप छाजेड यांच्याकडून करण्यात आला होता. त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर अंतिम निर्णय देताना त्या ईव्हीएम मशिनची तपासणी हैदराबाद फोरेन्सिक लॅबला करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीचे चित्रीकरण करण्यात आले. संपुर्ण सुरक्षिततेसह ही मशिन रवाना करण्यात आली.