बरे झालेले रुग्ण समाजाच्या मुख्य प्रवाहात

yerwada
yerwada

येरवडा :येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांच्या पुनर्वसनासाठी आता राज्याचे आरोग्य व सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. बरे झालेल्या रुग्णांना स्वतंत्र कक्षात ठेवले जाणार आहे. रुग्णांना थेट समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यामागचा हेतून असल्याची माहिती आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक नितिन बिलोलिकर यांनी दिली.

बिलोलिकर म्हणाले, ‘‘ मनोरुग्णालयात सध्या बरे झालेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यापैकी अनेकांना त्यांचे नातेवाईक घेऊन जात नाहीत. काही रुग्ण अनाथ तर काहींचा पत्ताच सापडत नाही. अशा विशेषत: बरे झालेल्या रुग्णांना पुन्हा मनोरुग्णांबराेबर ठेवणे संयुक्तीक ठरत नाही. त्यासाठी सामाजिक न्याय व आरोग्य विभागाने त्यांच्यासाठी पुनर्वसन प्रकल्प तयार केला आहे. यामध्ये मनोरुग्णालयाच्या सिमाभिंतीच्या बाजुने सामाजिक न्याय विभाग नवीन कक्ष बांधणार आहे. त्यामध्ये बरे झालेल्या रुग्णांना ठेवण्यात येणार आहे.’’

या कक्षात रुग्णांना विविध व्यवसायभिमुख कौशल्य देऊन त्यांना उद्योगात गुंतविण्यात येणार आहे.तेथे कागदी व कापडी पिशव्या तयार करणे, आकाशकंदिल, पणत्या इतर शोभेच्या वस्तू बनविण्यावर भर असलणार आहे. यासह त्यांना खेळ, मनोरंजनाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. रस्त्याच्याकडेला कक्ष असल्यामुळे त्यांचा सामाजातील सर्व घटकांचा संपर्क होईल, अशी त्यामागची संकल्पना असल्याचे बिलोलिकर यांनी सांगितले. 

‘‘ मनोरुग्णालयात डॉ. हमिद दाभोळकर चालवित असलेल्या ‘परिवर्तन’ अंतर्गत ’देवराई’ मध्ये ठेवण्यात येत होते. आता रुग्ण पुनवर्सन प्रकल्पात सामाजिक न्याय विभाग नवीन कक्ष बांधून देणार आहे. तर आरोग्य विभाग वैद्यकीय तज्ज्ञांसह मनुष्यबळ आणि वाहने उपलब्ध करून देणार आहे.’’
- डॉ. अभिजित फडणीस, अधिक्षक, येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय

‘‘ मनोरुग्णालयातील बरे झालेल्या रुग्णांसाठी ‘हाफ वे होम’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. नवीन बांधण्यात येणारा कक्ष हा रुग्णांसाठी ‘शेल्टर होम’ सुद्धा असणार आहे. या कक्षात सामाजातील सर्व सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत.त्यामुळे खऱ्या अर्थाने रुग्णांचे पुनर्वसन शक्य होणार आहे.’’
-डाॅ. संजय देशमुख, प्रभारी उपसंचालक, आरोग्य सेवा,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com