झगडेवाडीत पाझर तलावाचे खोलीकरण पूर्ण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

निमगाव केतकी : सकाळ रिलीफ फंडातून झगडेवाडी (ता. इंदापूर) येथील पाझर तलावाचे खोलीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले. सुमारे 15 हजार 634 घनमीटर एवढा गाळ काढण्यात आला आहे. या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर परिसरातील चारशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, अशी माहिती सरपंच रूपाली अतुल झगडे यांनी दिली. 

दरवर्षी उन्हाळ्यात झगडेवाडीत पाण्याची तीव्र टंचाई असते. गावच्या पाझर तलावात साठलेला गाळ काढण्यासाठी सकाळ रिलीफ फंडाची मदत मिळावी, अशी मागणी ग्रामस्थांनी "सकाळ'कडे केली होती. तीन मे ते 20 मे या कालावधीत तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले. या कामासाठी भारतीय जैन संघटनेने मोफत पोकलेन मशिन उपलब्ध करून दिले होते. या कामामुळे 14. 69 टीसीएम पाणीसाठा होणार आहे. 

झगडे म्हणाल्या, "तलावात अनेक दिवसांपासून गाळ साठलेला होता. त्यामुळे पाणीसाठवण क्षमता कमी झाली होती. आता खोलीकरणानंतर पावसाळ्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठणार आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. या कामामुळे ग्रामस्थ "सकाळ'चे सदैव ऋणी राहतील.'' 

यंदा गावाने पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या 45 दिवसांच्या कालावधीत श्रमदानातून गावात जलसंधारणाचे चांगले काम झाल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: percolation tank work done through Sakal relief Fund