अत्तराचा सुगंध अन्‌ सुरम्याचा गारवा!

अत्तराचा सुगंध अन्‌ सुरम्याचा गारवा!

पुणे - शिरखुर्म्यासाठी काजू, बदाम, पिस्ते, चारोळी अन्‌ बनारसी, पंजाबी शेवया....सहेरी आणि इफ्तारसाठी सौदी अरेबियाचे खजूर....रोट आणि नानाविध फळे....सामिष भोजनासह भरजरी कपडे...डोळ्यांना थंडावा देणारा सुरमा...सुगंधी अत्तर यांसारख्या विविध वस्तूंनी रमजाननिमित्त बाजारपेठ सजली आहे. बाजारात खरेदीसाठी मुस्लिम धर्मीयांबरोबरच अन्य नागरिकांची गर्दी होत आहे. 

कॅम्प भागात छत्रपती शिवाजी मार्केट, कोंढवा येथे कौसरबाग तसेच उपनगरांतही नानाविध टोप्यांसह कुरआनातील आयतच्या तसबिरी, जानमाज, कुरआनच्या प्रती विक्रीस आल्या आहेत. पहाटेची फजर, दुपारची जोहर, सूर्यास्ताअगोदरची असर, सायंकाळी मगरीब  आणि रात्रीची ईशाची नमाज  पठण करण्याकरिता मुस्लिम धर्मीयांसाठी विविध मशिदींमध्ये व्यवस्थाही करण्यात आली आहे. सामाजिक व राजकीय संस्थांतर्फे इफ्तार पार्टी आयोजिण्यात येत आहेत.  

बाजारपेठेतील वस्तूंबाबत विक्रेते दिलावर खान म्हणाले, ‘‘बनारस, राजस्थान, पंजाब, मालेगाव येथून रंगीबेरंगी शेवया मागवितो. हातावर केलेल्या शेवयाही आल्या आहेत. मात्र, पूर्वीपेक्षा हातावरच्या शेवयांचे प्रमाण मर्यादित आहे. 

देशी, परदेशी बनावटीच्या सुरम्याला रमजानमध्ये आवर्जून मागणी असते. स्त्रिया आणि पुरुषांसाठी निरनिराळे प्रकारचा सुरमा, अत्तर आली आहेत. अगदी पाच ग्रॅमपासून सुरमा व अत्तर उपलब्ध आहे.  
-उमर फारुक, विक्रेते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com